वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांत तेलंगणाच्या मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नंबर लागतो. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao to receive the highest honorarium; I get 4 lakh 10 thousand rupees monthly
भारतात एकूण २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मानधनावर नजर टाकली असता देशात सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असून ३ लाख ९० हजार रुपये दर महिन्याला मानधन म्हणून मिळतात. तिसऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असून त्यांना ३ लाख ६५ हजार रुपये मानधन म्हणून मिळतात. चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांना मासिक ३ लाख ४० हजार रुपये मानधन म्हणून मिळतात.
विशेष म्हणजे तेलंगणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्यपालांपेक्षाही अधिक मानधन मिळते. शिवाय वेगवेगळ्या भत्त्यांचाही लाभ मिळतो. याशिवाय सरकारी निवासस्थान, फोन बिल आणि गाडीसहीत अनेक सुविधा दिल्या जातात.
मुख्यमंत्र्यांचं मासिक मानधन
तेलंगणा ४,१०,००० रुपये
दिल्ली ३,९०,००० रुपये
उत्तर प्रदेश ३,६५,००० रुपये
महाराष्ट्र ३,४०,००० रुपये
आंध्र प्रदेश ३,३५,००० रुपये
गुजरात ३,२१,००० रुपये
हिमाचल प्रदेश ३१०,००० रुपये
हरियाणा २,८८,००० रुपये
झारखंड २,५५,००० रुपये
मध्यप्रदेश २,३०,००० रुपये
छतीसगड २,३०,००० रुपये
पंजाब २,३०,००० रुपये
गोवा २,२०,००० रुपये
बिहार २,१५,००० रुपये
पश्चिम बंगाल २,१०,००० रुपये
तामिळनाडू २,०५,००० रुपये
कर्नाटक २,००,००० रुपये
सिक्कीम १,९०,००० रुपये
केरळ १,८५,००० रुपये
राजस्थान १,७५,००० रुपये
उत्तराखंड १,७५,००० रुपये
ओडिसा १,६०,००० रुपये
मेघालय १,५०,००० रुपये
अरुणाचल प्रदेश १,३३,००० रुपये
आसम १,२५,००० रुपये
मणिपूर १,२०,००० रुपये
नागालँड १,१०,००० रुपये
त्रिपुरा १,०५,५०० रुपये
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App