अजमेर शरीफ बॉम्बस्फोटात संघाचे नेते इंद्रेश कुमारांचा हात; काँग्रेस नेते दिग्विजय सिंगांचा खळबळजनक आरोप

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सन 2007 मध्ये झालेल्या अजमेर शरीफ येथे ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्ग्यात झालेल्या बॉम्बस्फोटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचा हात आहे. त्यांचे नाव एफआयआर मध्ये दाखल असल्याचे मला पूर्ण माहिती आहे, असा दावा असा खळबळजनक दावा आणि आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे.Team leader Indresh Kumar’s hand in Ajmer Sharif bomb blast; Sensational allegation of Congress leader Digvijay Singh

काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन संकल्पनांमध्ये भेद आहे. मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही. महात्मा गांधी हिंदू होते आणि नथुराम गोडसे हिंदुत्ववादी होता, अशी वक्तव्य केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर इंद्रेश कुमार यांनी राहुल गांधींना हिंदू आणि हिंदूत्व या दोन्ही संकल्पना नीट कळलेल्या नाहीत, अशी टीका केली होती.



 

आता इंद्रेश कुमार यांच्या टीकेवरून या दिग्विजयसिंग यांनी थेट त्यांना टार्गेट केले आहे. ते म्हणाले, की इंद्रेश कुमार यांचे नाव एफआयआरमध्ये दाखल असल्याचे मला पूर्ण माहिती आहे. त्यांचा अजमेर शरीफ बॉम्ब स्फोट प्रकरणात हात आहे.

आज केवळ इंद्रेश कुमार यांच्या सुदैवाने केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे ते बाहेर फिरू शकत आहेत. अन्यथा इंद्रेश कुमार यांची जागा या बॉम्बस्फोटातील आरोपी जिथे आहेत, त्याच तुरुंगात राहिली असती, असा दावाही दिग्विजय सिंग यांनी केला आहे.

इंद्रेश कुमार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. राष्ट्रीय मुस्लीम मंच या संस्थेचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्यावर दिग्विजय सिंग यांनी बॉम्बस्फोटात हात असल्याचा थेट आरोप केल्याने आता संघाकडून याबाबत काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Team leader Indresh Kumar’s hand in Ajmer Sharif bomb blast; Sensational allegation of Congress leader Digvijay Singh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात