कर्मचार्यांच्या मृत्यूनंतरही टाटांची साथ ; ६० वर्ष वेतनासह घर वैद्यकिय सुविधा आणि मुलांचे शिक्षण
अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांच्या मृत कामगारांच्या कुटुंबीयांना काही ना काही मदत दिली, परंतु कदाचित ती दीर्घकाळापर्यंत पुरेशी नसेल. TATA WITH YOU YESTERDAY TODAY and TOMORROW! Humanity is the ultimate religion! For employees, the boss is really the ‘Ratan’ ; 60 Years Full Salary to Family of the employee
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्लीः भारताचे रतन टाटा नावाप्रमानेच खरोखरच ‘रतन’ ठरत आहेत.भारतावर संकट आले आणि रतन टाटा यांनी पुढाकार घेत या संकटाशी दोन हात केले नाही असे कधीही होणे नाही .यावेळी तर त्यांनी मोठा दिलासा दिला आहे .टाटा स्टील कंपनीने कर्मचार्यांसाठी मोठी घोषणा केली. कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान घरात कमावणाऱ्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळत आहे. घर कसे चालेल, मुलांचे शिक्षण कसे होईल, मुलीच्या लग्नाचा खर्च कुठून करायचा, अशा अनेक प्रश्नांमुळे कुटुंब निराश झाली आहेत. TATA WITH YOU YESTERDAY TODAY and TOMORROW! Humanity is the ultimate religion! For employees, the boss is really the ‘Ratan’ ; 60 Years Full Salary to Family of the employee
केंद्र किंवा राज्य सरकार आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर कुटुंबाला पेन्शन देते, पण खासगी कंपनीतील कर्मचार्यांची काळजी कोण घेणार आहे. कोरोना साथीच्या काळात अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांच्या मृत कामगारांच्या कुटुंबीयांना काही ना काही मदत दिली.
त्यातच टाटा स्टील कंपनीने आपल्या कर्मचार्यांसाठी मोठी घोषणा केली. कोरोना संकटाच्या वेळीही कर्मचारी सातत्याने कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्यावर असताना अनेक कर्मचार्यांचे मृत्यूही झाले. अशा परिस्थितीत कंपनीने म्हटले आहे की कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही ६० वर्षे सेवा पूर्ण होईपर्यंत कुटुंबास संपूर्ण वेतन दिले जाणार आहे. याबरोबरच निवास आणि वैद्यकीय सुविधादेखील देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार आहे.
#TataSteel has taken the path of #AgilityWithCare by extending social security schemes to the family members of the employees affected by #COVID19. While we do our bit, we urge everyone to help others around them in any capacity possible to get through these tough times. pic.twitter.com/AK3TDHyf0H — Tata Steel (@TataSteelLtd) May 23, 2021
#TataSteel has taken the path of #AgilityWithCare by extending social security schemes to the family members of the employees affected by #COVID19. While we do our bit, we urge everyone to help others around them in any capacity possible to get through these tough times. pic.twitter.com/AK3TDHyf0H
— Tata Steel (@TataSteelLtd) May 23, 2021
टाटा स्टील व्यवस्थापनाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, कंपनी आपल्या कर्मचार्यांना सामाजिक सुरक्षेच्या मदतीसाठी सर्वतोपरी पुढाकार घेत आहे, जेणेकरून कंपनीत कार्यरत प्रत्येक कर्मचार्यांचे भविष्य उत्तम होईल. टाटा मॅनेजमेंटने म्हटले आहे की, कोरोनामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास टाटा स्टील ६० वर्षे त्यांच्या अवलंबितांना संपूर्ण वेतन देईल. पगाराशिवाय कर्मचार्यांच्या कुटुंबांनाही क्वार्टर आणि वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील. इतकेच नव्हे तर टाटा स्टील व्यवस्थापनाने असेही जाहीर केले आहे की, जर कर्तव्य बजावताना कंपनीत कामगार मृत्युमुखी पडला तर त्यांच्या मुलांच्या पदवीचा संपूर्ण खर्च कंपनी व्यवस्थापन उचलेल.
तत्पर टाटा :– टाटा स्टील मॅनेजमेंटचे म्हणणे आहे की, कंपनी नेहमीच आपल्या कर्मचार्यांच्या आणि भागधारकांच्या फायद्यासाठी विचार करीत असते. कोविडच्या काळातही टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचार्यांचे आणि समाजाच्या सामाजिक कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. यापूर्वी टाटा यांनी कर्मचार्यांच्या हितासाठी अनेक पावले उचललीत आणि एक आदर्श मानक स्थापित केला.
टाटा स्टील ही देशातील पहिली कंपनी आहे, जी आपल्या कर्मचार्यांसाठी ८ तासांच्या कामाच्या शिफ्ट, कंपनीचा नफा-आधारित बोनस, सामाजिक सुरक्षा, प्रसूती रजा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची प्रभावीपणे अंमलबजावणी करते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App