LTTE नेता प्रभाकरन जिवंत असल्याचा तामिळ फुटीरतावादी नेते नेदुमारन यांचा दावा; दाव्यात तथ्य किती आणि संशय काय??

वृत्तसंस्था

चेन्नई : तामिळ फुटीरतावादी संघटना लिबरेशन टायगर ऑफ तामिळ इलमचा LTTE नेता वेलूपिल्लई प्रभाकरन जिवंत असल्याचा धक्कादायक दावा माजी काँग्रेस नेते आणि तामिळ फुटीरतावादी नेते पाशा नेदुमारन यांनी केला आहे. प्रभाकरन जिवंत आहे. तो सुखरूप आहे आणि लवकरच तो सर्वांसमोर येईल असा दावा करून नेदुमारन यांनी तामिळनाडू आणि श्रीलंकेत खळबळ माजवली आहे. Tamil separatist leader Nedumaran claims LTTE leader Prabhakaran is alive

श्रीलंका राजकीय आणि आर्थिक गर्तेत सापडली असताना प्रभाकरन जिवंत असल्याचा धक्कादायक दावा करून नेदुमारन यांनी त्या देशात अधिकच खळबळ माजवली आहे. प्रभाकर यांनी 1980 ते 90 च्या दशकात श्रीलंकेत तमिळींसाठी स्वतंत्र देशासाठी हिंसक आंदोलन चालवले होते. श्रीलंकेत तामिळींची फुटीरतावादी चळवळ चालल्याने भारत आणि श्रीलंकेतले संबंध प्रचंड तणावपूर्ण झाले होते.

या पार्श्वभूमीवर राजीव गांधींच्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी श्रीलंकेच्या जयवर्धने सरकार बरोबर शांतता करार करून तेथे तमिळींच्या स्वतंत्र देश मागण्याच्या मागणीला पाठिंबा दिला नव्हता, तर त्यांच्या सुविधा वाढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यामुळे राजीव गांधींची तामिळनाडू आणि दक्षिणेकडील राज्यात लोकप्रियता घटली होती. अखेरीस तामिळ अतिरेक्यांनीच तामिळनाडूतील श्रीपेरंबदूरमध्ये यांची हत्या केली होती. तत्पूर्वी श्रीलंकेतील एका नौसैनिकाने कोलंबो विमानतळावर त्यांच्यावर बंदुकीच्या दस्त्याने हल्ला केला होता. या सर्व हल्ल्यांमागे प्रभाकरनच असल्याचा त्यावेळी संशय होता.



परंतु 2009 मध्ये भारतात यूपीए सरकार असताना प्रभाकरन श्रीलंकेच्या जंगलात चकमकीत मारला गेल्याची बातमी आली होती. LTTE या फुटीरतावादी संघटनेच्या प्रवक्त्याने या चकमकीनंतर एक आठवड्याने प्रभाकरन मारला गेल्याची पुष्टी केली होती. परंतु आता तामिळनाडूतले फुटीरतावादी नेते पाशा नेदुमार यांनी प्रभाकरन जिवंत असल्याचा खळबळ जनक दावा केला आहे. खुद्द प्रभाकरन आणि त्याच्या कुटुंबीयांच्या परवानगीनेच हा खुलासा करत असल्याचाही त्यांचा दावा आहे. त्यामुळे श्रीलंकेत प्रचंड राजकीय आणि आर्थिक अस्वस्थता असताना अचानक प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करून नेदुमारन यांना तामिळनाडू आणि श्रीलंकेत नेमके काय घडवून आणायचे आहे? याविषयी मोठा संशय निर्माण झाला आहे.

कोण हे नेदुमारन??

88 वर्षांचे नेदुमारन हे तामिळनाडूतले राजकीय वयोवृद्ध नेते असून कामराज यांच्या काळात ते काँग्रेसचे नेते होते. कामराज यांच्याबरोबर ते एक दोनदा इंदिरा गांधीनाही भेटले होते. परंतु कामराज यांच्या निधनानंतर ते काँग्रेस पासून दूर गेले आणि त्यांनी तथाकथित तामिळ राष्ट्रवादाला खतपाणी घालण्याचे काम सुरू ठेवले. आजही ते तमिळ राष्ट्रवादच मानतात. त्यामुळेच त्यांनी प्रभाकरन जिवंत असल्याची पुडी तर सोडून दिली नाही ना??, असा संशय तामिळनाडूत व्यक्त करण्यात येत आहे.

Tamil separatist leader Nedumaran claims LTTE leader Prabhakaran is alive

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात