Tamil Nadu The Focus India Exit Poll Results 2021: तमिळनाडूत द्रमुकचा आवाज; स्टॅलिन नवे करूणानिधी

  • तमिळनाडूत सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजपची आघाडी आहे.
  • या विरोधात द्रमुक आणि काँग्रेसची आघाडी आहे. माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे.
  • त्यांचे पुतणे आमदार टी.टी.व्ही. दिनकरन यांनी मात्र, मागे न हटता निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. आता त्यांना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची साथ मिळाली आहे. त्यांच्या या आघाडीचा सर्वाधिक फटका सत्ताधारी अण्णाद्रमुकला बसण्याची चिन्हे आहेत.
  • द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्या नावाला मुख्यमंत्रिपदासाठी पसंती मिळण्याची चिन्हे आहेत.

विशेष प्रतिनिधी  

नवी दिल्ली: तमिळनाडूच्या राजकारणातील ही निवडणुक महत्वाची ठरणार आहे कारण दिग्गज नेते जयललिता आणि एम. करुणानिधी यांच्याशिवाय  पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. या दोघांच्या अनुपस्थितीत राज्यात निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.
एक्झिट पोलनुसार राज्यातील सत्ताधारी एआयएडीएमके (AIADMK) युतीला तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत  पराभवाचा सामना करावा लागणार आहे.
भाजपसोबत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी मैदानात उतरलेल्या अण्णाद्रमुक आघाडीला राज्यातील 234 विधानसभा जागांपैकी 70_80  जागांवर समाधान मानावे लागेल.

तर दुसरीकडे एक्झिट पोलनुसार तामिळनाडूमध्ये यावेळी द्रमुक-काँग्रेस आघाडी राज्यात सरकार स्थापन करेल.

या आघाडीला 150_160 जागा मिळतील असा अंदाज आहे. दुसरीकडे टीटीव्ही दिनाकरन यांच्या नेतृत्वाखालील एएमएमके युतीला केवळ 0 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 118 जागा जिंकणे आवश्यक आहे.

तुलनात्मक 2016 –

तामिळनाडूमध्ये मागच्या वेळी म्हणजेच 2016 च्या विधानसभा निवडणुकीत AIADMK आघाडीला 134 जागा मिळाल्या होत्या तर DMK आघाडी केवळ 98 जागांवर मर्यादित होती. तर एक्झिट पोलनुसार यावेळी एआयएडीएमके युतीला 60 जागांचा फटका बसताना दिसत आहे. तर डीएमके आघाडी 50 जागा जास्त घेत सत्तेत येताना दिसत आहे.

कोणाची कोणासोबत युती?
अण्णाद्रमुकने भाजपबरोबर युती केली आहे. त्यांच्यासमवेत पीएमके, टीएमएमके, पीडीके, एआयएमएमके, पीटीएमके, पीबीके, एमआरएमके आणि टीएमसी आहेत.

दुसरीकडे, द्रमुकबरोबरच काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, एमडीएमके, केएमडीके, आययूएमएल, एमएमके, टीव्हीके, एटीपी आणि एआयएफबी निवडणूक रिंगणात होते.

तर कमल हासन यांच्या पक्षाने मक्कल निधी मय्यम (एमएनएम) बरोबर एकत्र येऊन एआयएसएमके, आयजेके आणि टीएमजेकेसोबत निवडणूक लढवली.

याबरोबरच टीव्हीटी दिनाकर यांच्या पक्षाचे एएमएमके यांच्यासह अस्सुद्दीन ओवैसींच्या एआयएमआयएम, डीएमडीके आणि एसडीपीआयसह निवडणूक मैदानात उतरली होती.

Tamil Nadu The Focus India Exit Poll Results 2021

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात