वृत्तसंस्था
काबूल : अफगणिस्तानात सत्ता मिळवल्यानंतर आता तालिबानला आर्थिक संकटाने घेरण्यास सुरुवात केली आहे. तालिबानकडे कोणत्याही आ४थिक स्त्रोत नसल्याने त्यांनी आता चीनकड मदतीचा हात पसरला आहे. चीनदेखील याकडे संधी म्हणून पहात असल्याचे तज्ञांचे मत आहे. निधीसाठी आपली मदार चीनवर असेल आणि चीन हाच सर्वांत महत्त्वाचा भागीदार असेल असे तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्लाह मुजाहिद याने म्हटले आहे. Taliban depends upon china for monetary help
तालिबानने देशाची सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर अनेक देशांनी अफगाणिस्तानचा निधी रोखला आहे. अफगाणिस्तानला मानवतावादी मदत मिळावी म्हणून संयुक्त राष्ट्रांनी १.३ अब्ज डॉलर निधीसाठी आवाहन केले आहे. ही रक्कम केवळ ३९ टक्के निधी उभारता आली आहे असे यूएनचे प्रवक्ते स्टीफन दुजारीच यांनी सांगितले आहे.
मुजाहिद म्हणाला, अफगाणिस्तानला तातडीने निधीची निकड आहे, पण सुमारे दहा अब्ज डॉलरच्या घरातील मालमत्ता मिळविण्याची संधी वेगाने उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. याचे कारण अफगाण सेंट्रल बँकेची बहुतांश मालमत्ता परदेशात आहे.
या पार्श्वभूमीवर इटलीच्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती मुजाहिद म्हणाला की, चीनच्या मदतीने आर्थिक आघाडीवरील पीछेहाट भरून काढण्यासाठी आम्ही संघर्ष करू. चीनमुळे आम्हाला मूलभूत आणि अप्रतिम अशी संधी मिळाली आहे, याचे कारण गुंतवणूक करून आमच्या देशाची पुनर्बांधणी करण्यास चीन तयार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App