विशेष प्रतिनिधी
चियाली (तैवान) – चीनच्या कुरापतीने शेजारी देश त्रस्त झालेले असताना तैवानने आता सीमेवर अमेरिकेकडून मिळालेले अत्याधुनिक एफ-१६ लढाऊ विमाने तैनात केले आहेत. तैवानचे अध्यक्ष त्साई इग वेंग यांनी एफ-१६ विमाने हवाई दलाला अर्पण केले. चीनचा वाढता धोका लक्षात घेता तैवानने आपल्या संरक्षण सिद्धतेत वाढ केली आहे.Taiwan incorporates F 16 Planes on china border
ही विमाने तैवानकडे असलेल्या एकूण १४१ एफ-१६ ए/बी विमान ताफ्याचा एक भाग असून ते १९९० च्या मॉडेलचे प्रतिनिधित्व करते. वेंग यांनी म्हटले, की एफ-१६ विमाने हे अमेरिका आणि तैवान यांच्य संरक्षण सहकार्याच्या शक्तीचे प्रदर्शन घडवते. अमेरिका आणि चीन यांचे संबंध ताणलेले असताना तैवानने आपल्या सीमेवर अमेरिकेचे विमाने तैनात करून शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
चीनने तैवानच्या संरक्षित भागात लढाऊ विमाने तैनात करून तणावात भर घातली होती. या कृतीने चीनने तैवानावरील दावा आणखी बळकट केला. अध्यक्ष शी जिनिपिंग यांनी याच आठवड्यात एका आभासी परिषदेत अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी बोलताना तैवानबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की या बेटावर चीनकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांना आव्हान देणे म्हणजे आगीशी खेळण्यासारखे ठरू शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App