मोदी आडनावाला चोर ठरवणाऱ्या राहुल गांधींना सुरत कोर्टाची शिक्षा; राहुल गांधींना महात्मा गांधींची आठवण; काँग्रेसचे भाजप विरुद्ध आंदोलन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सगळेच चोर मोदी आडनावाचे कसे??, अशी बदनामीकारक टिपण्णी केल्याबद्दल काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधींना सुरत कोर्टाने दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यांना 30 दिवसांसाठी जामीनही दिला, पण त्यानंतर राहुल गांधींना महात्मा गांधींची आठवण आली आहे, तर काँग्रेसने कोर्टाच्या निकालावरून भाजप विरुद्ध आंदोलन केले आहे. Surat court sentences Rahul Gandhi for calling Modi a thief

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कर्नाटक मधल्या सभेत राहुल गांधींनी नीरव मोदी, ललित मोदी यांचा हवाला देत सगळेच सगळ्याच चोरांचे आडनाव मोदी कसे असते??, असा सवाल केला होता. या सवालाचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांनी जोडला होता.

पण त्यामुळे संतप्त झालेल्या मोदी समाजाने राहुल गांधीं विरुद्ध सुरत कोर्टात केस केली होती. भारतीय संविधानानुसार कोणत्याही व्यक्तीला धर्म जात लिंग या आधारावर टार्गेट करता येत नाही. या पार्श्वभूमीवर कोर्टाने कायदेशीर निकाल देत राहुल गांधींना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेला 30 दिवस स्थगिती देऊन त्यांना वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यासाठी संधीही ठेवली तसेच त्यांना जामीन देखील ताबडतोब मंजूर केला.

मात्र या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींना महात्मा गांधींची आठवण झाली आहे आणि सत्य हाच माझा धर्म आहे. तो अहिंसेवर आधारित आहे. सत्य अहिंसा हाच माझा ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे, हे महात्मा गांधींचे वक्तव्य राहुल गांधींनी ट्विट केले आहे.

पण कोर्टाने राहुल गांधींना शिक्षा दिल्यानंतर काँग्रेसने मात्र भाजप विरुद्ध आंदोलन सुरू केले आहे. तामिळनाडूतील काँग्रेसचे मुख्यालय सत्यमूर्ती भवन येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात आंदोलन केले आहे, तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी न्यायव्यवस्थेवर संशय व्यक्त केला आहे. भाजपने वारंवार न्यायाधीश बदलले तेव्हाच आम्हाला ते राहुल गांधींना दोषी ठरवतील अशी शंका वाटली होती. परंतु कायद्यावर आमचा विश्वास असल्यामुळे आम्ही कायदेशीर लढाईच देऊ, असे वक्तव्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.

राहुल गांधींना सुरत कोर्टाने सर्व कायदेशीर बाबींचा आढावा घेऊन दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, परंतु काँग्रेसने त्यांच्या शिक्षेला राजकीय रंग देत भाजप विरोधात आंदोलन चालविले आहे.

Surat court sentences Rahul Gandhi for calling Modi a thief

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात