Supreme court rejects petition to allow centre change option neet pg 2021 aspirants

NEET PG 2021 : आता परीक्षा केंद्र बदलता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली याचिका

NEET PG 2021 : NEET पदव्युत्तर परीक्षा केंद्रात बदल करण्याची मागणी करणारी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिका फेटाळताना न्यायमूर्ती यूयू ललित, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट्ट आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सांगितले की, देशभरात कोविड संसर्गाची परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे. याशिवाय प्रवासावरील निर्बंधही हटवले जात आहेत. अशा स्थितीत परीक्षा केंद्र बदलण्यात काहीच अर्थ नाही. Supreme court rejects petition to allow centre change option neet pg 2021 aspirants


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : NEET पदव्युत्तर परीक्षा केंद्रात बदल करण्याची मागणी करणारी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिका फेटाळताना न्यायमूर्ती यूयू ललित, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट्ट आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सांगितले की, देशभरात कोविड संसर्गाची परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे. याशिवाय प्रवासावरील निर्बंधही हटवले जात आहेत. अशा स्थितीत परीक्षा केंद्र बदलण्यात काहीच अर्थ नाही.

याचिकाकर्त्यातर्फे उपस्थित असलेल्या ज्येष्ठ वकील मीनाक्षी अरोरा यांनी युक्तिवाद केला होता की, केरळ, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोविड संसर्गाची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. न्यायालयाने म्हटले की, आता परिस्थिती बदलत आहे. देशात कुठेही प्रवासावर कोणतेही बंधने नाही. दिल्ली ते कोची आणि त्रिवेंद्रमपर्यंतच्या उड्डाणांच्या सर्व जागाही भरलेल्या आहेत. लसीकरणाचा वेग लोकांना संरक्षण देत आहे.

फक्त गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने NEET pg च्या दोन मुलींच्या परीक्षा केंद्रे बदलण्याची परवानगी दिली होती जे गर्भावस्थेच्या शेवटच्या महिन्यांत आहेत, परंतु त्यांना विशेष परिस्थितीत ही परवानगी देण्यात आली आहे.

याचिकेत विनंती करण्यात आली होती की, ज्यांनी 18 एप्रिल 2021 पर्यंत कोविड ड्यूटी केली आहे, त्यांना त्यांच्या सध्याच्या पोस्टिंगनुसार त्यांच्या आवडीचे जवळचे किंवा सोयीचे केंद्र निवडण्याची परवानगी द्यावी. संसर्गाच्या प्रसाराचे गांभीर्य लक्षात घेता, केरळमधील उमेदवारांनाही अशीच सूट देण्यात यावी, परंतु खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.

वेळापत्रकानुसार, NBE 11 सप्टेंबर 2021 रोजी NEET PG 2021 परीक्षा आयोजित करेल. NEET-PG 2021 ही संगणक आधारित परीक्षा आणि एकाच दिवशी आणि एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल.

अधिकृत सूचनेनुसार, “परीक्षा आयोजित करण्यापूर्वी अपात्र घोषित झालेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र दिले जाणार नाही. अशा परिस्थितीत, संपूर्ण शुल्क जप्त केले जाईल.”

NEET PG 2021 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे :

1. सर्वप्रथम nbe.edu.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. मुख्यपृष्ठावर, “NEET PG 2021 – Admit Card” वर क्लिक करा.
3. तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड एंटर करा.
4. लॉगिनवर क्लिक करा.
5. तुमचे NEET PG 2021 प्रवेशपत्र दिसेल.
6. ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

Supreme court rejects petition to allow centre change option neet pg 2021 aspirants

महत्त्वाच्या बातम्या