Agni Prime Missile : नव्या पिढीच्या ‘अग्नी प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; सशस्त्र दलात होणार समावेश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि सशस्त्र दलांचे केले अभिनंदन

विशेष प्रतिनिधी

श्रीहरीकोटा :  नवीन पिढीच्या ‘अग्नी प्राइम’ क्षेपणास्त्राचे पहिली प्री-इंडक्शन नाईट प्रक्षेपण (उड्डाण चाचणी) बुधवार (7 जून) ओडिशाच्या किनारपट्टीवर यशस्वीरित्या पार पडले. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून संध्याकाळी 7:30 वाजता क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी केली. Successful test of new generation Agni Prime missile

संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनानुसार, क्षेपणास्त्राच्या उड्डाण चाचणीदरम्यान सर्व उद्दिष्टांचे यशस्वीपणे परीक्षण करण्यात आले. निवेदनानुसार, क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी विकास चाचण्यांनंतर आयोजित केलेले हे पहिले प्री-इंडक्शन नाईल लान्च होते, ज्याने सिस्टमची अचूकता आणि विश्वासार्हता प्रमाणित केली.

रडार, टेलीमेट्री आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम यांसारखी रेंज इन्स्ट्रुमेंटेशन विविध ठिकाणी तैनात करण्यात आली होती, ज्यामध्ये दोन डाउन-रेंज जहाजांचा समावेश आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रक्षेपणाचा फ्लाइट डेटा कॅप्चर केला जाऊ शकतो.

यशस्वी उड्डाण चाचणी डीआरडीओ आणि स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहिली, असे निवेदनात म्हटले आहे. या चाचणीमुळे सशस्त्र दलात प्रणाली समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि सशस्त्र दलांचे नवीन जनरेशन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘अग्नी प्राइम’ च्या यशस्वी तसेच कॉपी-बुक कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.

डॉ. समीर व्ही कामत, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि DRDO चे अध्यक्ष, DRDO प्रयोगशाळांच्या चमूने आणि चाचणी प्रक्षेपणात सहभागी झालेल्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

Successful test of new generation Agni Prime missile

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात