मेघालयात सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी रस्सीखेच! भाजपाच्या संगमांना कोंडीत पकडण्याचा तृणमूल काँग्रेसचा डाव!

ममता बॅनर्जींचा मेघालयातही ‘खेला’ करण्याचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी

मेघालयात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिथे भाजपाच्या पाठिंब्यावर मेघालयचे मुख्यमंत्री आणि एनपीपीचे अध्यक्ष कोनराड संगमा हे सहज सरकार स्थापन करतील, असे वाटत होते. तिथे आता हा खेळ त्यांच्यासाठी सोपा नसल्याचे दिसत आहे. कारण, राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन मुख्यमंत्री संगमा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन, सरकार स्थापनेचा दावा केला आहे. मात्र असे असले तरी दुसरीकडे मुकुल संगमा यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसही सरकार स्थापनेसाठी प्रयत्नशील दिसत आहे. परिणामी आता मेघालयात सत्तेची खुर्ची मिळवण्याची लढाई रंजक दिसत आहे. या लढतीती एका बाजूला भाजपासमर्थित संगमा आहेत, तर दुसऱ्या बाजूला टीएमसीचे संगमा आहेत. Struggle to get the seat of power in Meghalaya Trinamools ploy to catch the Sangam of BJP in a dilemma


ममतादीदी मेघालयात तृणमूळला राष्ट्रीय पार्टी करायला गेल्या अन् बंगालच्या सागरदिघीला कसबा करून बसल्या!!


कोनराड संगमा यांचा दावा –

मेघालयचे मुख्यमंत्री आणि एनपीपी पक्षाचे प्रमुख कोनराड संगमा यांनी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला व सरकार स्थापनेचा दावा केला. याचसोबत ३२ आमदारांचा पाठिंबा असल्याचाही त्यांनी दावा केला आहे. तथापि, कोनराड संगमा यांनी अद्याप हे उघड केलेले नाही की त्यांचे २६ आमदार, २ भाजप आमदारांव्यतिरिक्त त्यांना इतर आमदारांचा पाठिंबा आहे. कोनराड संगमा यांनी राजभवनात जाण्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की भाजपाने आम्हाला आधीच पाठिंबा दिला आहे आणि इतर काही पक्षही पाठिंबा देत आहेत.

मुकुल संगमा यांचा दावा –

तृणमूल काँग्रेसने राज्यात पाच जागा मिळवून सर्वांनाच चकित केले आहे. काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी त्यांच्या ताज्या विधानातून सूचित केले आहे की ते राज्यात सरकार स्थापन करण्याचा विचार करत आहेत. निवडणूक निकालांबाबत मुकुल संगमा म्हणाले, ‘राज्यातील जनतेने विभाजित जनादेश दिला आहे. हा जनादेश परिवर्तनासाठी आहे. बाकीच्या राजकीय पक्षांनी समजून घेतले पाहिजे की या जनादेशासोबत एकत्र येऊन लोकांच्या भल्यासाठी काम करण्याची जबाबदारी येते.

या युतीचे नाव अद्याप ठरलेले नसले तरी आम्ही युतीची तयारी करत असल्याचे मुकुल संगमा यांनी सांगितले. ते म्हणाले की भाजप आणि एनपीपी व्यतिरिक्त इतर पक्ष एकत्र येत आहेत आणि आम्ही सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करू. निवडणूक निकालांबाबत विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

या निवडणुकीत टीएमसीला पाच जागा मिळाल्या आहेत. तर UDP ला ११ जागा मिळाल्या आहेत. याशिवाय व्हॉईस ऑफ द पीपल्स पार्टीच्या खात्यात चार जागा, एचएसपीडीपी आणि पीडीएफच्या खात्यात २-२ जागा आणि अपक्षांच्या खात्यात २ जागा गेल्या आहेत.

Struggle to get the seat of power in Meghalaya Trinamools ploy to catch the Sangam of BJP in a dilemma

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात