विशेष प्रतिनिधी
बेळगाव : महाराष्ट्र आणि खासकरून मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने कडक निर्बंध आणि खबरदारी बाबत आदेश दिले आहेत. सीमावर्ती भागातील चेकपोस्टवर कोविडचे दोन डोस आणि आरटीपीसीआर चाचणी केल्याचे प्रमाणपत्र तपासणीचे आदेश बजाविण्यात आल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.Strict restrictions of Karnataka on those coming from Maharashtra due to corona
पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले, दोन आठवड्यापासून महाराष्ट्र (आणि खासकरून मुंबईत ओमिक्रॉन रुग्णांत वाढ झाली आहे. यामुळे सरकारने खबरदारी घेण्यास सुरु केली आहे. चाचण्या आणि लसीकरण वाढविण्याचे आदेश दिले आहेत.
१५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी उद्यापासून (दि. ३ जानेवारी) लसीकरण सुरु केले जात आहे. दुसरीकडे संभाव्य तिसरी लाट व ओमिक्रॉनचे वाढते संकट लक्षात घेऊन या संदर्भात पूर्वतयारी सुरु आहे. वैद्यकीय उपचार, बेड्स आणि औषध व्यवस्था केली असल्याचे बोम्मई यांनी सांगितले.
बोम्मई म्हणाले, कर्नाटक-मुंबई या दरम्यान खूप मोठे व्यापार संबंध आहेत. सीमावर्ती भागात नियमित प्रवाशांची ये-जा सुरु असते. आर्थिक उलाढालीसह व्यवसाय नियमित चालतो. या कारणांनी महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्यांवर निर्बंध घातले आहे.
ज्यांच्याकडे ७२ तासाच्या आतील आरटीपीसीआर चाचणी आणि कोरोनाचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आहे. त्यांनाच प्रवेश देण्याबाबत आदेश अधिकाºयांनाच दिले आहेत. चेकपोस्टवर काटेकोर तपासणीचे निर्देश आहेत. बेळगाव बरोबरच विजापूर जिल्ह्यातील चेकपोस्टबाबत असाच निर्णय घेण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App