वृत्तसंस्था
नवी दिल्ली : २०३० पर्यंत वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी १०० अब्ज डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य आणि २०३० पर्यंत वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी २५० अब्ज डॉलर्सचे एकूण लक्ष्य असल्याची माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दिली.Steps to progress: 250 billion dollars revenue from textile sector by 2030
गुजरातच्या राजकोटमध्ये गोयल यांच्या उपस्थितीत हातमाग आणि हस्तकला विषयाला वाहिलेल्या ई-वाणिज्य संकेतस्थळाचे डिजिटल उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. “सौराष्ट्र तामिळ संगम’ ह्या कार्यक्रमाचा भाग म्हणून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल देखील उपस्थित होते. शाश्वततेसाठीची भारताची वचनबद्धता लक्षात घेऊन वस्त्रोद्योग क्षेत्रात पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय कृती दल लवकरच तयार केले जाईल, अशी माहितीही पीयूष गोयल यांनी दिली.
सोमनाथ आणि राजकोट इथल्या या दोन दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चिंतन शिबिरात पीयूष गोयल सहभागी झाले होते. यावेळी वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह या क्षेत्राच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.
वस्त्रोद्योग क्षेत्राला अधिक गतिमान बनवण्यासाठी फलदायी चर्चा झाली, असे गोयल यांनी यावेळी सांगितले. पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय अनुपालन प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर काही उत्पादक आणि निर्यातदारांना दुप्पट मूल्य मिळत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अधिक उत्पादक आणि निर्यातदारांसाठी हे प्रमाणीकरण सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App