राष्ट्रपती निवडणूक : ममता बॅनर्जींच्या बैठकीपूर्वी विरोधकांमध्ये फूट; केसीआर, केजरीवाल, ओवैसी टाळणार बैठक!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला टक्कर देण्याच्या मनसुबा राखणाऱ्या ममता बॅनर्जी यांना आजच्या दुपारच्या बैठकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. Split in opposition before Mata Banerjee’s meeting; KCR, Kejriwal, Owaisi to avoid meeting

ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीस तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव किंवा तेलंगण राष्ट्र समितीचा कोणीही नेता उपस्थित राहणार नाही. त्याचबरोबर असदुद्दीन ओवैसी यांना निमंत्रण नसल्यामुळे एआयएमआयएम पक्षाचा प्रतिनिधी देखील बैठकीला हजर राहणार नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीचे नेते देखील बैठकीला हजर राहणार नाहीत. विरोधकांचा उमेदवार पाहून त्यांना मते द्यायची का नाहीत, हे आम आदमी पार्टी नंतर ठरवणार आहे.

– बैठकीपूर्वी फुटीची बीजे

आता या 3 महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने विरोधी ऐक्य साधले जाण्यापूर्वीच त्यामध्ये फुटीची बीजे पेरली गेली आहेत. वायएसआर काँग्रेसचे नेते आणि आंध्राचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, बिजू जनता दलाचे नेते आणि ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना मूळातच विरोधकांच्या बैठकीचे निमंत्रणच नाही. त्यामुळे ते देखील या बैठकीला अर्थातच हजर राहणार नाहीत.

बैठकीला हजर राहण्याची शक्यता असलेल्या समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांचे नेमके कोणते नेते हजर राहणार आहेत, याचे तपशील अद्याप मिळालेले नाहीत. शिवसेनेच्या वतीने मात्र सुभाष देसाई यांनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती आहे.

– आधीच बळ तोळामासा

मूळातच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांकडे आवश्यक मतांचे बळ नाही. त्यातच शरद पवारांना विरोधकांचा सर्वसंमतीचा उमेदवार होण्याची गळ त्यांच्या इच्छेविरुद्ध सर्व विरोधक एकत्र येऊन घालत आहेत. परंतु आता विरोधकांमध्ये बैठकीपूर्वी फूट पडल्याने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांचा सर्वसंमत उमेदवार उभे करण्यामध्ये मोठे अडथळे उत्पन्न झाले आहेत.

Split in opposition before Mata Banerjee’s meeting; KCR, Kejriwal, Owaisi to avoid meeting

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात