विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेत नमाजसाठी वेगळ्या प्रार्थना कक्षाची मागणी करण्यात आली आहे. अशी मागणी समाजवादी पक्षाचे (सपा) आमदार इरफान सोलंकी यांनी केली आहे. त्यांनी सभापती हृद्य नारायण दीक्षित यांच्याकडे सभागृहात नमाजसाठी प्रार्थना कक्षाची मागणी केली आहे. ते म्हणाले की, विधानसभेत इबादतसाठी एक खोली दिल्यास कुणालाही त्रास व्हायचे कारण नाही.SP MLA Irfan Solanki Demands Room For Namaz in UP Assembly
कुणालाही त्रास होणार नाही – आ. इरफान सोलंकी
सपा आमदार म्हणाले, “इबादतही आवश्यक आहे आणि विधानसभा अधिवेशनदेखील आवश्यक आहे. विधानसभेत प्रार्थनेसाठी जागा असावी.” सोलंकी म्हणाले की, मुस्लिम आमदारांना अधिवेशन सोडून मशिदींमध्ये नमाजासाठी जावे लागते.
विधानसभा अध्यक्षांची इच्छा असल्यास ते एक छोटी खोली इबादत करण्यासाठी देऊ शकतात. ते म्हणाले की यामुळे कोणालाही त्रास होणार नाही किंवा कोणतीही समस्या येणार नाही.
दरम्यान, यापूर्वी झारखंडमध्ये नमाजसाठी स्पीकर रूम देण्यात आली आहे. मात्र, विरोधी पक्ष भाजपनेही सभापतींच्या निर्णयाला विरोध केला आहे. झारखंड विधानसभेच्या अध्यक्षांनी नमाजसाठी खोली देण्याचे आदेश जारी केले आहेत. “नवीन विधानसभा इमारतीत प्रार्थना करण्यासाठी खोली क्रमांक TW 348 देण्यात आला आहे,” असे आदेशात म्हटले आहे
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App