वृत्तसंस्था
लखनौ – उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाचे १९ पैकी ११ आमदार फुटल्यानंतर जाग्या झालेल्या बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मुलायम सिंग यादव यांच्या समाजवादी पक्षावर टीकेची झोड उठविली आहे. SP is propagating lies about some BSP MLAs joining their party. We (BSP) had suspended them long back for conspiring with SP against a Dalit leader to defeat him in the Rajya Sabha polls: BSP president Mayawati
मायावतींच्या पक्षाचे ११ आमदार फुटले असले, तरी समाजवादी पक्षाने त्यांना आपल्या पक्षात सामील केलेले नाही. यावरूनच मायवतींनी समाजवादी पक्षाला घेरले आहे. समाजवादी पक्षाच्या नेतृत्वावर टीकास्त्र सोडणारी एकामागून एक ट्विट्स त्यांनी केली आहे.
समाजवादी पक्षाला फक्त दुसऱ्या पक्षांमध्ये फूट पाडायची आहे. एका उद्योगपतीला हाताशी धरून त्यांनी दलितपुत्राला राज्यसभा निवडणूकीत पाडले होते. त्यावेळी बसपमधून एका आमदाराला निलंबित केले होते. त्यालाच हाताशी धरून समाजवादी पक्ष फाटाफूट घडवून आणतोय, अशी टीका मायावतींनी ट्विटमधून केली आहे.
समाजवादी पक्षाने नेहमीच असे फोडाफोडीचे आणि जोडतोडीचे राजकारण केले आहे. आताही बहुजन समाज पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करून ते मीडियातून बसप फुटल्याची अफवा पसरवत आहेत. परंतु, समाजवादी पक्षाचे दुटप्पी राजकारण पाहा ते फुटलेल्या आमदारांना समाजवादी पक्षात सामील करून घेत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे, की बसपच्या फुटीर आमदारांना समाजवादी पक्षात सामील केले, की खुद्द समाजवादी पक्षातच फूट पडेल, अशा शब्दांत मायावतींनी समाजवादी पक्षाच्या नेतृत्वावर प्रहार केला आहे.
SP is propagating lies about some BSP MLAs joining their party. We (BSP) had suspended them long back for conspiring with SP against a Dalit leader to defeat him in the Rajya Sabha polls: BSP president Mayawati pic.twitter.com/AZEikPCrsZ — ANI (@ANI) June 16, 2021
SP is propagating lies about some BSP MLAs joining their party. We (BSP) had suspended them long back for conspiring with SP against a Dalit leader to defeat him in the Rajya Sabha polls: BSP president Mayawati pic.twitter.com/AZEikPCrsZ
— ANI (@ANI) June 16, 2021
उत्तर प्रदेशात २०१२ मध्ये बसपचे ८० आमदार होते. २०१७ मध्ये आमदारांची संख्या घटून १९ वर आली होती. त्यापैकी ११ आमदारांनी वेगळा गट केल्याचा दावा आहे. त्यांना समाजवादी पक्षाची फूस असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे. समाजवादी पक्षाची स्थितीही उत्तर प्रदेशात चांगली नाही. २०१२ साली समाजवादी पक्षाचे २२४ आमदार होते. अखिलेश यादव मुख्यमंत्री होते. पण २०१७ मध्ये त्यांचा दारूण पराभव होऊन ४७ आमदार उरले.
आता मायावतींचा बहुजन समाज पक्ष आणि मुलायम सिंग यादव यांचा समाजवादी पक्ष एकमेकांवर पक्षात फूट पाडण्याचे आरोप – प्रत्यारोप करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App