घडामोड बिहारमध्ये; हालचाल दिल्लीत; धक्का मुंबईत!!; दुःख आर्थर रोड जेलच्या न्यायालयीन कोठडीत!!


विनायक ढेरे

घडामोड बिहारमध्ये; हालचाल दिल्लीत आणि धक्का मुंबईत!! अशी काहीशी राजकीय परिस्थिती असल्याचे आज 10 ऑगस्ट 2022 रोजीचे चित्र दिसते आहे. बिहारमध्ये आपल्या राजकीय सवयीप्रमाणे फ्लिप फ्लॉप भूमिका घेत नितीश कुमार आज आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथ हे बरोबर दिल्लीच्या राजकारणातले त्यांचे वजन विरोधी गोटा मध्ये वाढणार आहे… आणि एकदा हे वजन वाढले की त्यांना विरोधी गोटा मधला सर्वात प्रभावी घटक संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे संयोजक पद दिले जाणार आहे. अर्थात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. Sonia Gandhi may appoint Nitish Kumar as UPA convener, this amounts cut to size Sharad Pawar

 नितीश कुमार यूपीए संयोजक??

नितीश कुमार यांना बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबरोबरच यूपीएचे संयोजक पद बहाल झाले की त्यांचे दिल्लीतले राजकीय स्थान उंचावल्याबरोबरच सोनिया गांधी यांच्या खालोखालचे होणार आहे. म्हणजे नंबर दोनचे होणार आहे आणि नेमका हाच खऱ्या अर्थाने शरद पवारांना राजकीय धक्का मानला जात आहे.

पवारांच्या यूपीए अध्यक्षपदाचे राऊतांचे प्रयत्न

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत हे पवारांच्या यूपीए अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी फारच उतावीळ होऊन राजकीय प्रयत्न करत होते. या प्रयत्नांना मराठी माध्यमांनी देखील मनापासून साथ दिली होती. “आजारी” सोनिया गांधी यांना बाजूला करून शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले की ते आपोआपच विरोधी आघाडीतून पंतप्रधान पदाचे उमेदवार ठरतील हा राजकीय आशावाद त्यामागे होता. परंतु आता सोनिया गांधी आजारातून बऱ्या झाल्या. त्या राजकीय दृष्ट्या ॲक्टिव्ह झाल्या. नॅशनल हेराल्ड केस मध्ये त्या ईडीच्या चौकशीला सामोरे देखील गेल्या आणि त्यानंतर बिहार मधली राजकीय घडामोडी घडली आहे. या घडामोडीतून भाजपला जसा सत्तेच्या बाहेरचा रस्ता पाहायला लागला आहे तसाच असलेल्या अथवा नसलेल्या यूपीएच्या संयोजक पदाचा बाहेरचा रस्ता शरद पवारांना पाहायला लागण्याची चिन्हे आहेत.

यूपीए अध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेचा परिणाम

शरद पवारांनी गेल्या दोन वर्षांमध्ये आपल्या राजकीय ताकदीने दिल्लीत विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा भरपूर प्रयत्न करून पाहिला. आपले निवासस्थान 6 जनपथ येथे बैठका भरवून पाहिल्या. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीची माळ आपल्या गळ्यातून यशवंत सिन्हा यांच्या गळ्यात घातली. उपराष्ट्रपतीपणाची उमेदवारीची गळ माळ मार्गारेट अल्वांना घातली. राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत विरोधी आघाडीचे काम पवारांनी यशस्वीरित्या क्कमपणे” सांभाळले!!
अर्थात काँग्रेसच्या नेत्यांनी पवारांच्या प्रयत्नांना राजकीय अर्थाने दुय्यम प्रतिसाद दिला होता. त्यातही जेव्हा संजय राऊत यांच्या लेखणीतून पवारांची यूपीए अध्यक्ष पदाची महत्त्वाकांक्षा जागृत झाली त्यामुळे काँग्रेस जनांचे कान टवकारले गेले होते. याचा आता 6 – 8 महिन्यांनंतर परिणाम दिसतो आहे. बिहारमध्ये राजकीय घडामोडी घडल्यानंतर हालचाल दिल्लीतून सुरू झाली आहे आणि त्याचे राजकीय प्रसाद मुंबईत उमटले आहेत.

नितीश उंचावले पवार कट टू साईज!!

अर्थात या सर्व घडामोडींचा घडामोडींमधून केंद्रातील सत्ताधारी भाजपवर काही परिणाम होण्याची सुताराम शक्यता नाही. शिवाय नितीश कुमार यांची दिल्लीतल्या राजकारणात काय उंची वाढायची ती वाढो. त्याचा परिणाम मोदींच्या प्रतिमेवर काय व्हायचा तो होवो. नितीश कुमार पंतप्रधान मोदींसमोर काय आव्हान उभे करायचेत ते करो… मोदी नितीश कुमार यांचे काय होईल?? हा भाग अलहिदा!! पण नितीश कुमार यांची दिल्लीच्या राजकारणात राजकीय उंची वाढणे म्हणजे पवार दिल्लीच्या राजकारणातून उरलेसुरले देखील “कट टू साईज” होणे, हे मात्र निश्चित!! म्हणजे नीतीश कुमार धक्का द्यायला गेले बिहार मधल्या भाजपला. सोनिया गांधी त्यांना यूपीए संयोजक पद देण्याच्या हालचाली करत आहेत दिल्लीत आणि प्रत्यक्षात धक्का बसलाय पवारांना!! हेच आजचे राजकीय वास्तव आहे.

– दुःख आर्थर रोड जेलमध्ये

आणि हे घडत असण्याच्या दिवशी पवारांचे खंदे समर्थक संपादक मात्र आर्थर रोड जेलच्या न्यायालयीन कोठडीत आहेत!!

Sonia Gandhi may appoint Nitish Kumar as UPA convener, this amounts cut to size Sharad Pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात