विशेष प्रतिनिधी
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसच्या 85 व्या महाधिवेशनात रायपूर मध्ये आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. 2000 ते 2025 अशा 25 वर्षातल्या एका महत्त्वाच्या नेत्याच्या राजकीय कारकीर्दीची अखेर होणार आहे. ज्यांचा जन्म भारतात झालाच नाही, भारताच्या राजकीय क्षितिजावर ज्यांचा उदय होण्याची अपेक्षाही कोणी केली नव्हती, त्या सोनिया गांधींनी आपल्या परकीयत्वाच्या पार्श्वभूमीवर देखील भारतीय राजकारणावर ठसा उमटवला, इतकेच नव्हे तर आपल्या कारकीर्दीच्या शिखरस्थानी असताना संपूर्ण देशावर सत्ता गाजवून दाखवली. हे त्यांचे भले बुरे कर्तृत्व नाकारता येणार नाही. Sonia Gandhi indicates retirement, national level achiever than any other regional Dynasty leader like Mulayam Singh Yadav or sharad Pawar
मुलायम सिंह, पवारांनी आणला अडथळा
देशभरातल्या कोणत्याही तोकड्या कर्तृत्वाच्या प्रादेशिक नेतृत्वापेक्षा सोनिया गांधींचे नेतृत्व निखालसपणे मोठे आणि अधिक उंचीचे होते, हे मान्य करावे लागेल. अन्यथा मुलायम सिंह यादव, शरद पवार, लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वा भोवती परकीयत्वाचे अडथळे उभे केले असताना त्यांच्यावर मात करून सोनिया गांधी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सर्वोच्च नेत्या बनूच शकल्या नसत्या!! भले मुलायम सिंह यादव यांनी अडथळा आणल्यामुळे आणि राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी शपथ देण्यास नकार दिल्यामुळे सोनिया गांधी यांचे पंतप्रधान पद हुकले असेल, पण राष्ट्रीय पातळीवरचे त्यांचे यूपीए काळातले सर्वोच्च महत्त्व मुलायम सिंह यादव, शरद पवार अथवा लालूप्रसाद यादव हे नेते कधीही कमी करू शकले नाहीत. त्याउलट या तीनही नेत्यांचे सोनिया गांधींनी पाय अशा पद्धतीने कापून ठेवले की त्यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा किंबहुना पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा कायमची करपून गेली!! हे काही सोनिया गांधींचे लहान सहान कर्तृत्व नव्हे!! मुलायम सिंह यादव, शरद पवार आणि लालूप्रसाद यादव त्या तीनही प्रादेशिक नेत्यांना सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालीच काम करावे लागले.
वाजपेयी, अडवाणींच्या भाजपला हरविले
इटली सारख्या छोट्या देशातून येऊन भारतासारख्या अवाढव्य देशावर राज्य करणे ही सोपी बाब नव्हती, ती देखील तेव्हा ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखा सर्वोत्तम लोकप्रियतेचा नेता भाजपचे नेतृत्व करत होता लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखा संघटन कुशल नेता भारतीय राजकारण व्यापून उरला होता, त्या भाजपला सोनिया गांधींनी 2004 आणि 2009 या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभूत करून दाखवले होते.
2012 नंतर गाडी घसरणीला
2012 नंतर त्यांची राजकीय गाडी घसरली आणि अखेर त्यांच्याच नेतृत्वाखाली 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने लोकसभा निवडणुकीतील परफॉर्मन्सचा तळ गाठला. पण त्यावेळी देखील काँग्रेसजनांची एवढी हिंमत नव्हती, की ते समोर येऊन सोनिया गांधी यांचे नेतृत्व नाकारू शकतील अथवा त्यांना बाजूला करू शकतील. अखेर सोनिया गांधींनी स्वतःहून जबाबदारी घेऊ पराभवाची जबाबदारी घेऊन पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि 2017 मध्ये राहुल गांधींवर पक्ष नेतृत्वाची धुरा सोपवली. पण त्यांचेही नेतृत्व तितकेसे चमकदार ठरू शकले नाही. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा परफॉर्मन्स 2014 च्या तुलनेत उंचावला खरा, पण तो फक्त 44 वरून 54 जाऊ शकला. तेव्हा देखील राहुल गांधींना चॅलेंज करण्याची काँग्रेसजनांची हिंमत राहिली नव्हती. स्वतः राहुल गांधींनीच अखेर बाजूला होऊन पुन्हा सोनिया गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोपवली.
Yatra has come as a turning point. It has proved that the people of India overwhelmingly want harmony, tolerance & equality. It has renewed the rich legacy of dialogue between our party & the people. The Congress stands with the people & fights for them. : Smt Sonia Gandhi Ji pic.twitter.com/ySflezWHWx — Congress (@INCIndia) February 25, 2023
Yatra has come as a turning point. It has proved that the people of India overwhelmingly want harmony, tolerance & equality. It has renewed the rich legacy of dialogue between our party & the people.
The Congress stands with the people & fights for them.
: Smt Sonia Gandhi Ji pic.twitter.com/ySflezWHWx
— Congress (@INCIndia) February 25, 2023
हंगामी अध्यक्ष पदाचे रेकॉर्ड
सोनिया गांधींचे हे पण एक रेकॉर्ड आहे, की त्या सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल अडीच वर्षे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष राहिल्या आहेत. सोनिया गांधी आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च स्थानी असताना त्यांच्या काळात काँग्रेस प्रणित यूपीए सरकारवर अनेक घोटाळ्यांचे आरोप झाले हे खरे. त्यांच्या कायदेशीर लढाई सोनिया गांधी, राहुल गांधी, सोनियांचे जावई रॉबर्ट वड्रा आणि बाकीचे काँग्रेस नेते लढत आहेत हेही खरे!!, या कायदेशीर लढाईचा न्यायालयात जो निकाल लागायचा असेल तो लागेलही, पण त्याची राजकीय शिक्षा मात्र 2014 मध्येच काँग्रेसला मिळाली आहे.
मोदींच्या भरारीपुढे झेप मंदावली
2014 ते 2023 या आठ वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आणि भाजप या पक्षाने जी प्रचंड भरारी घेतली आहे, त्यापुढे सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची झेप मंदावलेलीच राहिली आहे. 2007 मध्ये “मौत के सौदागर” म्हणून घडलेली चूक सोनिया गांधी आणि काँग्रेस यांना 2023 मध्ये भोवते आहे आणि 2024 मध्ये देखील भोवणार आहे.
परकीय नेतृत्व, पण मोठे कर्तृत्व
पण असे असूनही, परदेशातून भारतात गांधी घराण्याची सून म्हणून येऊन 10 वर्षे सर्वोच्च स्थानी राहून सत्ता गाजविणे आणि संपूर्ण राजकीय कारकीर्दीत कोणत्याही प्रादेशिक तोकड्या कर्तृत्वाच्या नेत्यापेक्षा राष्ट्रीय पातळीवरचे नेतृत्व सिद्ध करून केंद्रस्थानी राहणे हे सहज सोपे नसणारे काम सोनिया गांधींनी करून दाखवले!!, हे त्यांचे राजकीय कर्तृत्व त्यांच्या निवृत्तीच्या वेळी स्वीकारावेच लागेल!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App