जुही चावलाच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सुरू झाले घुंगट की आड मे दिलबर का.., अतिउत्साही चाहत्यावर न्यायालयाच्या बेअदबीचा खटला चालविण्याचे आदेश


प्रसिध्द अभिनेत्री जुही चावला यांनी पर्यावरण, तसेच जीवसृष्टीला धोका असल्याचा आक्षेप घेत देशात फाईव्ह- जी सेवेविरोधात दिल्ली न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदभार्तील याचिकेवर बुधवारी ऑनलाइन सुनावणी सुरू असताना तिच्या चाहत्यांनी गाणी गुणगुणणे सुरू केल्याने सगळेच चक्रावून गेले. मोबाइलचा आवाज म्यूट करा, असे सांगूनही हा प्रकार तीन वेळा घडला. त्यामुळे न्यायालयाने कामकाजात व्यत्यय आणणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कोटार्ची बेअदबी केल्याचा खटला दाखल करण्याचे आदेश दिले.Song during Juhi Chawla’s petition hearing


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : प्रसिध्द अभिनेत्री जुही चावला यांनी पर्यावरण, तसेच जीवसृष्टीला धोका असल्याचा आक्षेप घेत देशात फाईव्ह- जी सेवेविरोधात दिल्ली न्यायालयात धाव घेतली आहे.

यासंदभार्तील याचिकेवर बुधवारी ऑ नलाइन सुनावणी सुरू असताना तिच्या चाहत्यांनी गाणी गुणगुणणे सुरू केल्याने सगळेच चक्रावून गेले. मोबाइलचा आवाज म्यूट करा, असे सांगूनही हा प्रकार तीन वेळा घडला.त्यामुळे न्यायालयाने कामकाजात व्यत्यय आणणाºयांना शोधून त्यांच्यावर कोटार्ची बेअदबी केल्याचा खटला दाखल करण्याचे आदेश दिले.५-जी यंत्रणेमुळे देशातील नागरिक, सजीव प्राणी, वनस्पती, तसेच एकूणच पर्यावरणावर विपरीत परिणाम होईल, असा आक्षेप जुही चावला हिने घेतला आहे.

५-जी नेटवर्क सुरू झाल्यानंतर सर्वांनाच दिवसाचे २४ तास सतत रेडिएशनचा सामना करावा लागेल. ५-जीमुळे होणारे रेडिएशन आतापेक्षा १० ते १०० पटींनी अधिक असणार आहे. त्यामुळे देशातील ५-जी यंत्रणा बसविण्याचे काम थांबविण्यात यावे,

अशी मागणी जुही चावलासह अन्य दोघांनी याचिकेद्वारे केली आहे. याप्रकरणी कोटार्ने आदेश राखून ठेवला आहे.याचिकेच्या सुनावणीची लिंक जुही चावलाने इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.

ऑनलाईन सुनावणीत जुही चावला जॉइन होताच तिचा एक चाहता तिच्याच ‘हम है राही प्यार के’ या सिनेमातील ‘घुंगट की आड मे दिलबर का… हे गाणे गुणगुणू लागला. त्यामुळे सगळेच अवाक झाले.

त्यावर न्या. जे. आर. मिधा यांनी जुही चावलाचे वकील दीपक खोसला यांना हा आवाज म्यूट करण्यास सांगितले. त्यानंतरही काही वेळ सुनावणी नीट सुरू राहिली; परंतु काही वेळातच सगळ्यांना जुही चावला यांचे एकेकाळी गाजलेले लाल लाल ओठों पे गोरी किसका नाम है… हे गाणे ऐकू येऊ लागले.

जुहीच्या आणखी एका चाहत्याने हा अतिउत्साह दाखविला होता. हे गाणे थांबत नाही तोवर आणखी एक जण मेरी बन्नो की आयेगी बारात… हे गाणे म्हणू लागला. या प्रकारामुळे न्यायाधीश चांगलेच संतापले

. न्यायाधीशांनी या व्यक्ती कोण आहेत याचा शोध घेऊन त्यांना कोटार्चा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजाविण्याचे आदेश दिले. त्यानुसार दिल्ली न्यायालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला

या व्यक्तींचा शोध घेऊन पुढील कारवाईसाठी त्यांची माहिती दिल्ली पोलिसांना द्यावी लागणार आहे. या सुनावणीत सामील झालेल्या काही जणांनी मोबाइलवर जुही चावला हिचा फोटोही झळकावला होता.

Song during Juhi Chawla’s petition hearing

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण