विशेष प्रतिनिधी
तारापूर : बिहारमधील पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांनी नितीश सरकारच्या नेतृत्वावर कडाडून टीका केली आहे. कन्हैया कुमार म्हणतात बिहारमध्ये लोकांना रोजगार शिक्षण उपचार यासाठी स्थलांतरित व्हावे लागते. आता अशी परिस्थिती येईल की लोकांना हनिमूनसाठी सुद्धा स्थलांतरित व्हावे लागेल. राज्यात स्थलांतर ही एक मोठी समस्या आहे. आणि नितीश सरकारच्या नेतृत्वाखाली विकास शुन्य आहे.
‘..So Biharis will have to migrate for honeymoon too’: Kanhaiya Kumar
त्याचप्रमाणे त्यांनी काँग्रेससोबतची युती तोडल्याबद्दल देखील जोरदार टीका केली आहे. ते म्हणतात,आरजेडीने हे लक्षात ठेवले पाहिजे की कॉंग्रेस हा एक मोठा पक्ष आहे आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय देशात कोणत्याही सरकार स्थापन होऊ शकत नाही. राज्यातील स्थलांतराचा दर रोखण्यामध्ये अपयशी ठरल्याबद्दल नितीशकुमार सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली आहे.
काश्मीरमध्ये बिहारींच्या हत्येवर नितीश कुमार म्हणाले – “कुछ तो गड़बड़ है , हेतुपुरस्सर लक्ष्य केलं जातय”
कन्हैया 25 ऑक्टोबरपर्यंत तारापूर येथे आहेत तर 26 आणि 28 ऑक्टोबरपर्यंत कुशेईश्वर आस्थापनांमध्ये प्रचार करणार आहेत. पोटनिवडणुकीत कॉंग्रेस चांगली कामगिरी करेल आणि दोन्ही जागा जिंकेल असा त्यांनी विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App