काश्मी्र खोऱ्यात ग्रेनेड हल्ल्यात ६ जखमी, लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर – जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी बसस्थानकाजवळ लष्कराच्या पथकावर ग्रेनेड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रेनेड रस्त्यावरच फुटल्याने सहा नागरिक जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. गेल्या महिनाभरात काश्मीार खोऱ्यात दहशतवादी हल्ल्यात आणि विविध घटनांत ११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.six injured in Granade attack

परप्रांतीयांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लष्कर आणि पोलिसांनी तीव्र मोहीम सुरू केली आहे. मृत ११ जणांपैकी पाच जण बिहारचे तर उर्वरित काश्मीरर पंडित होते. त्यात दोन शिक्षकांचा समावेश होता.



बांदिपोराच्या संबल बसस्थानकाजवळ सकाळी लष्कराच्या ताफ्यावर ग्रेनेड फेकण्यात आला. हल्लेखोराचे लक्ष्य चुकल्याने ग्रेनेड रस्त्यावरच फुटला. या स्फोटामुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. स्फोटाचा आवाज ऐकताच परिसरात एकच एकच गोंधळ उडाला. या स्फोटात सहा नागरिक जखमी झाले आणि त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले.

तत्पूर्वी रविवारी दहशतवाद्यांनी जैनापोरा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला होता. यावेळी सीआरपीएफने प्रत्युत्तर देताना एका काश्मिरी नागरिकाचा मृत्यू झाला. फळविक्रेता शहीद एजाज असे त्याचे नाव होते.

six injured in Granade attack

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात