लंडनमध्ये तिरंग्याचा अपमान झाल्याबद्दल दिल्लीत शिखांचा संताप; ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने

Shikh delhi

‘भारत आमचा अभिमान आहे’, ‘राष्ट्रध्वजाचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही’, असे फलक हाती घेत घोषणाबाजी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील तिरंगा ध्वजाचा खलिस्तान समर्थक फुटीरतावाद्यांकडून अपमान करण्यात आला, या निषेधार्थ शीख समुदायाच्या लोकांनी सोमवारी दिल्लीत संताप व्यक्त करत निदर्शने केली. दिल्लीतील चाणक्यपुरी येथील ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेर शीख समुदायाचे लोक मोठ्या संख्येने जमले. यावेळी ते हातात तिरंगा ध्वज आणि घोषणांचे फलक घेऊन ते निषेध करत होते. ‘भारत आमचा अभिमान आहे’, ‘राष्ट्रध्वजाचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही’ असं त्यांनी हातात घेतलेल्या फलकांवर लिहिलेले होते. Sikhs protest outside British High Commission in Delhi over London incident by pro Khalistani elements

खलिस्तान समर्थक खासदार सिमरतजीत सिंह मान यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड; अमृतपाल सिंहच्या एन्काऊंटरची पसरवली अफवा!!

तिरंगा खाली आणण्याचा प्रयत्न झाला –

रविवारी कट्टरपंथी खलिस्तान समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातून तिरंगा हटवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर भारत सरकारने ब्रिटीश राजनैतिक अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावले. यासोबतच लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाची खिडकी तोडल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. कट्टरवाद्यांचा हल्ला आम्ही हाणून पाडला असून तिरंगा अभिमानाने फडकत असल्याचे भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले आहे. यादरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांचे दोन सदस्यही जखमी झाले होते.

ब्रिटन उच्चायुक्तालयाभोवती सुरक्षा वाढवण्यात आली –

शीख समुदायाचा रोष पाहता दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोमवारी शीख समुदायाचे लोक मोठ्या संख्येने उच्चायुक्तालयासमोर निदर्शने करण्यासाठी आले होते, लंडनमधील घटनेवर लोकांनी संताप व्यक्त केला. तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नानंतर आंदोलकांना हटवले. यानंतर उच्चायुक्तालयाभोवती आणखी सुरक्षा वाढवण्यात आली. निदर्शनादरम्यान शीख समुदायाचे लोक ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या मुख्य गेटवर पोहोचले होते.

Sikhs protest outside British High Commission in Delhi over London incident by pro Khalistani elements

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात