विशेष प्रतिनिधी
अमृतसर : पंजाब कॉंग्रेसचे प्रदेशाध्यपद मिळताच माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या दिवंगत वडीलांचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबरील छायाचित्र ट्विट करून टीकाकारांची तोंडे गप्प केली आहेत.Sidhuus twit trgets CM
मुख्यमंत्री अमरिंदर यांचा सिद्धू यांच्या नियुक्तीला विरोध होता. या पार्श्वभूमीवर वडील आणि नेहरूंचे छायाचित्र ट्विट करीत सिद्धू यांनी लिहिले की, माझे वडील सरदार भगवंत सिंग काँग्रेस कार्यकर्ते होते. त्यांनी आलिशान घराचा त्याग करून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली.
त्यांना मृत्युदंड ठोठावण्यात आला होता, पण राजाने त्यांची शिक्षा माफ केली. नंतर माझे वडील जिल्हा काँग्रेस समितीचे प्रमुख, दोन्ही सभागृहांत आमदार तसेच अॅडव्होकेट जनरल झाले. महत्त्वाचे म्हणजे अमरिंदर यांचे पिता पतियाळा राजघराण्याचे शासक होते.
अमरिंदर यांना सिद्धू यांची प्रतिक्रिया झोंबणारी ठरली आहे. रविवारी पंजाबमधील दहा आमदारांनी सिद्धू यांच्या नियुक्तीला विरोध दर्शविला होता. साऱ्या राज्यात दिवसभर सिद्धू यांच्या प्रतिक्रियेचीच चर्चा होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App