विशेष प्रतिनिधी
चंदीगड : पंजाबचे नूतन प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू यांनी स्वत:ची टीम बांधायला सुरूवात केली आहे. त्यांनी चार सल्लागारांची निवड केली आहे. विशेष म्हणजे यातील तीन जण हे अराजकीय आहेत. मुख्यमंत्री कॅ.अमरिंदर सिंग यांना पूर्णपणे अंधारात ठेऊन या नियुक्तया करण्यात आल्या आहेत.Sidhu appointed four advisers, keeping Chief Minister Amarinder Singh in the dark
फतेहगढ साहिबचे खासदार डॉ.अमर सिंह, माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफा, सामाजिक कार्यकर्ते आणि बाबा फरीद आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार डॉ.प्यारेलाल गर्ग आणि माजी शिक्षक मालविंदर सिंह माळी यांची सिध्दू यांनी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. हे सल्लागार त्यांच्या क्षेत्रात प्रदेशाध्यक्षांना मदत आणि मार्गदर्शन करतील. मात्र, बिगर कॉँग्रेस सदस्यांच्या या नियुक्तीमुळे कॉँग्रेसच्या नेत्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.
सल्लागारांची निवड म्हणजे सिध्दू यांनी पक्षांतर्गत विरोधकांना दिलेलाा सूचक इशारा म्हणून पाहिजले जात आहे. या नियुक्ती करताना पक्षाच्या हायकमांडने नियुक्त केलेल्या कुलजीत नागरा, संगतसिंग गिलझियन, पवन गोयल आणि सुखविंदर सिंग डॅनी या चार कार्यकारी अध्यक्षाशीही सल्लामसलत केली नाही, अशी तक्रार होत आहे.
सिध्दू हे पंजाबच्या मंत्रीमंडळात मंत्री असताना डॉ. अमर सिंह त्यांचे सल्लागार होते. मात्र, सिध्दू यांचे मंत्रीपद गेल्यावर डॉ. सिंह यांची नियुक्ती सरकारने वैध केली नाही. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ते खासदार झाला.
पंजाबच्या मंत्रीमंडळातील मंत्री असलेल्या रजिया सुल्ताना यांचे मोहम्मद मुस्तफा हे पती आहेत. पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांच्या नियुक्तीविरोधात त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्याचबरोबर सिध्दू यांच्याशी निष्ठावान असलेल्या मंत्र्यांची त्यांनी नेहमीच तळी उचललेली आहे.माजी शिक्षक मालविंदर सिंग माळी हे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे कठोर टीकाकार म्हणून ओळखले जातात. सिध्दू यांचे मात्र सोशल मीडियातून सतत कौतुुक करत असतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App