आफताब लव्ह जिहाद : श्रद्धा वालकर गर्भवती?; पोलीसांचा त्या दिशेने तपास


विशेष प्रतिनिधी

मुंबई : श्रद्धा वालकर हिला प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यानंतर हत्या करून शरीराचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबच्या विरोधात देशभरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज या प्रकरणी नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. यामध्ये आफताबकडून श्रद्धा गर्भवती होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे, ऑप इंडिया या वेबसाईटने ही बातमी दिली आहे. Shraddha Walker Pregnant?; Police investigation in that direction

 व्हाट्सअप आणि इतर सोशल मीडियाची तपासणी 

पोलीस सध्या आफताबची कसून चौकशी करत आहेत, परंतु तो पोलिसांना सहकार्य करत नाही, उलट तो पोलिसांना संभ्रमित करत आहे. मात्र त्याच्या एकूण वर्तनातून पोलिसांना या प्रकरणात अनेक संशयास्पद गोष्टी आढळून येत आहेत. पोलीस १८ मे २०२२ रोजी श्रद्धाचे व्हाट्स ऍप चॅटिंग तपासत आहेत. ज्या दिवशी युवतीची हत्या झाली, त्या दिवसाचे हे चॅटिंग पोलीस विशेष लक्षपूर्वक तपासत आहेत. यावरून हत्येच्या वेळी श्रद्धा ही गर्भवती होती, असा दिल्ली पोलिसांना संशय आला आहे. पण हत्येनंतर इतक्या महिन्यांनी तिची गर्भधारणा जंगलात सापडलेल्या हाडांवरून निश्चित करणे कठीण असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे पोलीस आता यासंबंधीच्या माहितीसाठी ठोस पुरावे चॅटिंगच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियावर तिने केलेल्या संवादानुसार जमा करत आहेत.

 श्रद्धाची कबुली  

मराठी अभिनेत्री संगीता पाटील आणि सागरिका सोना सुमन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही श्रद्धा सुमारे एक वर्षापूर्वी गरोदर होती. तिला आफताबशी विवाह करून त्या बाळाला आफताबचे नाव द्यायचे होते. एक वर्षापूर्वी मुंबईतील जुहू बीचवर स्वच्छता मोहिमेत सहभागी होताना त्या श्रद्धाची संगीता पाटील आणि सागरिका सोना सुमन यांची भेट झाली होती. सुमनच्या म्हणण्यानुसार, श्रद्धाने ३-४ लोकांना सांगितले होते की,  ती गर्भवती आहे आणि तिला आफताबशी लग्न करायचे आहे, त्यानंतर तिच्या पोटात असलेल्या बाळाला जन्म द्यायचा आहे.

Shraddha Walker Pregnant?; Police investigation in that direction

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात