ममतादीदींच्या निकटच्या सहकारी श्राबंती चॅटर्जी यांची भाजपला सोडचिठ्ठी


वृत्तसंस्था

कोलकता : भाजपमध्ये प्रवेश केलेले अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. भाजपकडे पश्चिम बंगालच्या भविष्यासाठी कोणताही कार्यक्रम नसल्याचे सांगत त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. तृणमूल काँग्रेसचे वजनदार नेते पार्थ चॅटर्जी यांच्याविरुद्ध त्यांनी निवडणूक लढविली होती. मात्र, यात त्यांचा पराभव झाला होता. Shrabanti Mukharjee resigns from BJPपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नजीकच्या सहकारी असलेल्या श्राबंती बॅनर्जी यांनी मार्चमध्ये तृणमूल काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्यात अपयश आल्यानंतर श्राबंती चॅटर्जी भाजपपासून अंतर राखून होत्या. त्यानंतर, त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. ‘गेल्या विधानसभा निवडणुकीत मी भाजपसाठी संघर्ष केला. मात्र, पक्षात बंगालच्या भविष्यासाठी पुढाकार घेण्याच्या आणि प्रामाणिकपणाचा अभाव असल्याने मी भाजपबरोबरचे संबंध तोडत आहे,’ असे ट्विट त्यांनी केले.

Shrabanti Mukharjee resigns from BJP

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय