विशेष प्रतिनिधी
रायसेन: उत्तर प्रदेशातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी वापरलेला बुलडोझर पॅटर्न आता मध्य प्रदेशातही वापरला जाणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गोरगरिबांना त्रास देणाºया गुंडा-पुंडांवर बुलडोझर चालविण्याचा इशारा दिला आहे.Shivraj Singh Chouhan took the example of Yogi Adityanath, now the bulldozer will run in Madhya Pradesh too
शिवराज सिंह चौहान म्हणाले, मध्य प्रदेशात आता काँग्रेस आणि कमलनाथ यांचं सरकार नाही तर ‘मामाराज’ आहे. त्यामुळे कुणी गुंड वा गुन्हेगार गोरगरिबांना त्रास देत असेल तर त्याची गाठ माझ्याशी आहे. त्याच्याविरुद्ध कोणतीही पर्वा न करता बुलडोझर चालवला जाईल.
रायसेनमधील सिलवानी तालुक्यातील खमरिया गावात होळीच्या रात्री दोन गटांत संघर्ष उसळला होता. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेची शिवराज यांनी गंभीर दखल घेतली. ते थेट खमरिया गावात दाखल झाले व त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले.
यावेळी बोलताना शिवराज यांनी गुंड आणि गुन्हेगारांना थेट शब्दांत इशारा दिला. कुणी गडबड गोंधळ करण्याचा प्रयत्न केलाच तर त्याची खैर नसेल इतके याद राखा. मामाचा बुलडोझर चालला आहे. हा बुलडोझर दहशत पसरवणाऱ्या गुंडांविरुद्ध यापुढेही चालणार आहे.
गुंडांच्या दहशतीला मूठमाती दिल्याशिवाय हा बुलडोझर थांबणार नाही. जर गुंडाने किंवा गुन्हेगाराने एखाद्या गरिबाला त्रास दिला तर टोकाचे पाऊल उचलले जाईल. त्याचं घर खोदून तिथे मैदान तयार केले जाईल. त्याला मी सळो की पळो करून सोडेन, असा इशारा चौहान यांनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App