विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दयेवर निवडणूक लढवित असलेले अभिनेते आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वत:ची तुलना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली आहे. मला जर असनसोलमध्ये बाहेरचं म्हटलं जात असेल तर वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवली आहे. त्याला तुम्ही काय म्हणाल असा सवाल त्यांनी केला आहे.Shatrughan Sinha, who is contesting elections at the mercy of Mamat Banerjee, compared himself to Prime Minister Narendra Modi.
शत्रुघ्न सिन्हा यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी असनसोल लोकसभेच्या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी सिन्हा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली होती.
तृणमूलच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे असनसोलमधून लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आमचे उमेदरवार असतील हे जाहीर करताना आनंद होत आहे.मात्र, मुळचे बिहारचे असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना पश्चिम बंगालमध्ये बाहेरचा म्हणून हिणविले जाऊ लागले आहे. त्यामुळे त्यांनी आपली तुलना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App