राहुलजींना शिक्षा आशेचा किरण, कधीच बाजूने नसलेले विरोधक आज काँग्रेसच्या बरोबर; शशी थरूर यांच्या तोंडून बाहेर आली विरोधकांची मजबुरी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बरे झाले राहुल गांधींना शिक्षा झाली. राहुल गांधींना झालेली शिक्षा हा काँग्रेससाठी आशेचा किरण ठरला. कारण कधीच बरोबर नसलेले विरोधक आज काँग्रेस बरोबर आले, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या तोंडून विरोधकांची मजबुरी बाहेर आली आहे. Shashi tharoor explains opposition parties compulsion to rally behind rahul Gandhi

देशातल्या सर्व मोदींना चोर ठरवल्याबद्दल सुरत कोर्टाने राहुल गांधींना शिक्षा दिली. त्यामुळे कायदेशीर तरतुदींच्या आधारे आपोआप त्यांची खासदारकी रद्द झाली. मात्र काँग्रेसने हा मुद्दा कायदेशीर दृष्ट्या लढण्यापेक्षा राजकीय लाभाचा करून तो रस्त्यावर लढविण्याचे ठरविले आहे. काँग्रेसने ठिकठिकाणी संकल्प सत्याग्रह आंदोलन केले आहे.



या पार्श्वभूमीवर शशी थरूर यांनी एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत एक वक्तव्य केले. राहुल गांधींना झालेली शिक्षा हा काँग्रेससाठी आशेचा किरण ठरला आहे. कारण कधीच आमच्याबरोबर नसलेले सर्व विरोधक आज आमच्या बाजूने उभे राहिले आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी आणि तेलंगणात केसीआर चंद्रशेखर राव हे कधीच काँग्रेस बरोबर नव्हते. ते आज काँग्रेस बरोबर आले आहेत, असे शशी थरूर म्हणाले. पण यानिमित्ताने त्यांच्या तोंडून बाकीच्या विरोधकांची राजकीय मजबुरीच बाहेर पडली.

राहुल गांधींना सुरत कोर्टाने शिक्षा सुनावण्यापूर्वी दोन-तीन दिवस आधीच ममता बॅनर्जी यांनी वेगवेगळ्या नेत्यांना भेटून काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्या उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना भेटल्या देखील होत्या. काँग्रेसला वगळून देशात भाजप विरोधात तिसरी आघाडी उभारण्यास सुरुवात देखील झाली होती. पण राहुल गांधींना सुरत कोर्टाने शिक्षा सुनावली त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली आणि तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांवर पाणी फेरले.

राहुल गांधींना झालेली शिक्षा आणि त्यानंतर रद्द झालेली खासदारकी यामुळे राजकीय अपरिहार्यता निर्माण होऊन सर्व विरोधकांना नाईलाजास्तव राहुल गांधींच्या भोवती उभे राहावे लागले. शशी थरूर यांच्या तोंडून विरोधी पक्षांची हीच राजकीय मजबुरी वेगळ्या भाषेत बाहेर आली आहे.

Shashi tharoor explains opposition parties compulsion to rally behind rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात