विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची त्यांच्या संसदेतल्या कार्यालयात भेट घेतली. साखरेचे भाव वाढवून द्यावेत, नवीन इथेनॉल पॉलिसी आणावी, रायगड जिल्ह्यामध्ये एनडीआरएफचे स्वतंत्र केंद्र असावे आदी मागण्या घेऊन शरद पवार हे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना घेऊन अमित शहा यांना भेटले.Sharad pawar meets co operation minister amit shah
पण यातली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पवारांनी नेमका आजचाच मुहूर्त अमित शहा यांना भेटण्याचा कसा निवडला?, या “राजकीय योगायोगाची” राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सर्व विरोधकांची एकजूट साधण्यासाठी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांना कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ब्रेकफास्टला बोलवले होते.
शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या खासदारांना राहुल गांधी यांच्या ब्रेकफास्ट मिटींगला पाठवून दिले आणि आज दुपारी दोन वाजता त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत अमित शहा यांची भेट घेतली. यातून त्यांनी एकाच वेळी दोन डगरींवर पाय ठेवल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे.
राहुल गांधी यांच्याकडे सर्व विरोधकांचे नेतृत्व आले तर ते शरद पवार ममता बॅनर्जी मायावती यांना मान्य होईल काय?, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात असतानाच पवारांनी राहुल गांधींच्या ब्रेकफास्ट मीटिंगनंतर अमित शहा यांची भेट घेऊन राहुल गांधींच्या नेतृत्वावर ठळक प्रश्नचिन्ह लावल्याचे बोलले जात आहे.
सुनील तटकरे यांच्या समवेत पवारांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यात आपला विषय मांडून तटकरे निघून गेले. त्यानंतर शरद पवारांनी 15 मिनिटे स्वतंत्रपणे अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. या १५ मिनिटांच्या चर्चेत नेमकी काय “राजकीय खिचडी” शिजली?, याविषयी दिल्ली आणि मुंबई इथल्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
यावेळी शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्या समवेत प्रकाश नाईकनवरे व जयप्रकाश दांडेगावकर हे महाराष्ट्रातल्या साखर महासंघाचे पदाधिकारी होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App