शरद पवारांनी कोरेगाव भीमा दंगलीचा ठपका ठेवला देवेंद्र फडणवीस यांच्यावर, म्हणाले पोलीसांनी कारवाई न करता केले दुर्लक्ष


कोरेगाव भीमा हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर बोलताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दंगलीचा ठपका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठपका ठेवला आहे. कोरेगाव -भीमा हिंसाचारावेळी पोलिसांनी योग्यवेळी कारवाई न करता दुर्लक्ष केले त्यामुळे हिंसाचार भडकला असा दावा त्यांनी केला आहे. Sharad Pawar blames Devendra Fadnavis for Koregaon Bhima riots, says police ignored without taking action


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर बोलताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दंगलीचा ठपका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठपका ठेवला आहे. कोरेगाव -भीमा हिंसाचारावेळी पोलिसांनी योग्यवेळी कारवाई न करता दुर्लक्ष केले त्यामुळे हिंसाचार भडकला असा दावा त्यांनी केला आहे.

पवार म्हणाले, पोलिसांनी योग्यवेळी काळजी घ्यायला हवी होती. हिंसाचाराची घटना आपल्याला माध्यमांतून समजले. मला कुणावरही वैयक्तिक किंवा राजकीय आरोप मला करायचे नाहीत.संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना मी व्यक्तिश: ओळखत नाही. जे काही घडले ते दुदैर्वी होते. अशी स्थिती नियंत्रित करण्याची जबाबदारी यंत्रणेची होती. त्यांनी कुचराई केली असून वेळीच हे थांबवता आले असते पण थांबवले गेले नाही .


काेरेगाव-भीमा घटना प्रकरणात माझा काेणत्याही पक्षावर आराेप नाही -शरद पवार भिडे, एकबाेटेंवर आराेप करणाऱ्या शरद पवारांचे चाैकशी आयाेगासमाेर घुमजाव


यावेळी मिलींद एकबोटे यांच्या वकीलांनी शरद पवार यांना प्रश्न विचारले. तुमच्या प्रतिज्ञापत्रात तुम्ही म्हटले की, तुम्हाला या घटनेबद्दल काहीही माहिती नाही, तुमची माहिती ही मीडियात आलेल्या बातमीवर अवलंबून आहे का? त्यावर पवार म्हणाले, होय, मीडियातून काही गोष्टी समोर आल्या होत्या. 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद झाली. त्यानंतर 1 जानेवारी 2018 मध्ये ही घटना घडली.

राईट विंगची व्याख्या करताना पवार म्हणाले, म्हणजे या विचारांचे लोक समाजात धर्म, जातींमध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. लेफ्ट विंग ही एक विचारधारा आहे.

Sharad Pawar blames Devendra Fadnavis for Koregaon Bhima riots, says police ignored without taking action

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात