दिवाळी साजरी करण्यामागील महत्वाच्या घटना आणि हेतू

विशेष प्रतिनिधी

मुंबई: यावर्षी दिवाळी ४ नोव्हेंबरला येत आहे. भारताच्या निरनिराळया भागात दिवाळी साजरी केली जाते. त्यामागे काही प्रमुख घटना व कारणे आहेत. दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी आता सुरू झाली आहे. या काळात लोक नवीन चांगले कपडे घालतात व घरांमध्ये आकाशदिवे व रोषणाई करतात. दिवाळी का साजरी केली जाते यामागे एक सोडून ७ कारणे आहेत. आम्ही त्याच घटना व कारणे सांगणार आहोत ज्या तुम्हाला कदाचित माहित नसतील.

Seven different reasons why we celebrate Diwali

१: रामायणामध्ये राम, सीता आणि लक्ष्मण चौदा वर्षाचा वनवासातून रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले. दिवाळी त्यांच्या परत घरी येण्याबद्दल साजरी केली जाते.

२: आणखी एक मोठी परंपरा म्हणजे देवी लक्ष्मी समुद्रमंथनातून बाहेर पडली. देवी लक्ष्मीने विष्णूंना दिवाळीच्या रात्री आपले पती म्हणून स्वीकारले आणि त्या दोघांचा विवाह झाला.

३: महाभारताप्रमाणे कौरवांनी पांडवांना जुगारात हरवून बारा वर्षे वनवासाला पाठवले होते. कार्तिक अमावस्येच्या रात्री पांडव हस्तिनापुरात परत आले.

४: शीख लोकांच्यात गुरुगोविंद सिंग यांना मुघल सम्राट जहांगीरने मुक्त केले. ह्या कारणामुळे दिवाळी साजरी केली जाते.

५: जैन धर्मामध्ये महावीरांच्या निर्वाणाची एनिवर्सरी म्हणून दिवाळी साजरी केली जाते.

६: भारतातील काही भागात उदा. गुजरातमधे दिवाळी हा नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केली जाते.

७: कालीमातेने अनेक राक्षसांचा संहार करून जगाला राक्षसांपासून मुक्त केले. पश्चिम बंगाल सारख्या काही राज्यात कालीमातेच्या पूजेसाठी दिवाळी साजरी केली जाते.

Seven different reasons why we celebrate Diwali

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात