वृत्तसंस्था
लखनौ : कोविशील्ड लस मिळाल्यानंतरही अँटीबॉडीज तयार झाल्या नाहीत. त्यामुळे मानवाधिकार कार्यकर्ते प्रताप चंद्र यांनी शनिवारी एसीजेएम -५ दंडाधिकारी शांतनु त्यागी यांच्या न्यायालयात १५६-३ अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक अदर पूनावाला, ड्रग कन्ट्रोल डायरेक्टर, आयसीएमआर, आरोग्य सचिव आणिजागतिक आरोग्य संघटना (WHO) विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. Serum Institute’s Adar Poonawala and several others have been charged with fraud
प्रताप चंद्राने ३० मे रोजी अशियाना ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे लखनौचे पोलिस आयुक्त आणि पोलिस महासंचालक यांच्याकडे तक्रार करून गुन्हा नोंदवण्याची विनंती केली. अखेर त्यांना न्यायालयात जाऊन गुन्हा दाखल करावा लागला.
प्रताप चंद्र याचं नेमक म्हणणं काय?
कोविशील्ड ही लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे. या लसीला आयसीएमआर, आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य मिशनाद्वारे मान्यताप्राप्त आहे. विविध वृत्तपत्र ,मासिकांनी, दूरदर्शनद्वारे लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले होते.
त्यानुसार मी ८ एप्रिल रोजी गोविंद हॉस्पिटल, आशियाना पोलिस स्टेशन, रुचि खंड येथे लसीचा पहिला डोस घेतला. दुसर्या डोसची निर्धारित तारीख २८ दिवसांनंतर दिली होती. परंतु मला सांगण्यात आले की आता दुसरा डोस ६ आठवड्यांनंतर दिला जाईल. त्यानंतर सरकारने जाहीर केले की आता दुसरा डोस ६ नव्हे तर १२ आठवड्यांनंतर दिला जाईल.
लस घेतल्यानंतर माझी तब्येत ठीक नव्हती आणि २१ मे रोजी आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद टीव्ही वाहिन्यांवरून पाहिली. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटलं की, कोविशील्ड लसीच्या पहिल्या डोसनंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात.
हेच तपासण्यासाठी मी २१ मे रोजी सरकारमान्य लॅब थाररोकेअर मध्ये COVID Antibody GT चाचणी केली. मात्र २७ मे रोजी माझा रिपोर्ड निगेटिव्ह आला. म्हणजेच माझ्या शरीरात अँटिबॉडिज तयार झाल्या नाहीत.
उलट माझ्या शरीरातील प्लेटलेट्स ३ लाखांवरून १.५ लाखांपर्यंत कमी झाल्या.त्यामुळे मला फक्त फसवले असून माझ्या जीवालादेखील मोठा धोका निर्माण झाला, असे प्रताप चंद्र यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App