विशेष प्रतिनिधी
मुंबई – सेन्सेक्सने ५५,४३७ अंशांवर मुसंडी मारली असून निफ्टी १६,५२९ अंशांवर स्थिरावला. सेन्सेक्सचा हा सर्वकालिक उच्चांक आहे.सेन्सेक्सने ५० हजारांपासून ५५ हजारांपर्यंतचा टप्पा केवळ सात महिन्यांत गाठला आहे. २१ जानेवारी रोजी सेन्सेक्सने व्यवहारादरम्यान ५० हजारांचा टप्पा गाठल्यावर काल म्हणजे १३ ऑगस्टला ५५ हजारांच्या पुढे मजल मारली.Sensex hits at 55,000 mark
२१ जानेवारीनंतर व्यवहाराच्या दहा सत्रांमध्ये पाच फेब्रुवारीला ५१ हजार अंशांवर गेलेल्या सेन्सेक्सने नंतर सहा सत्रांमध्ये म्हणजे १५ फेब्रुवारीपर्यंतच ५२ हजारांना स्पर्श केला.पण नंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्याची आगेकूच मंदावली व त्याने ५३ हजारांचे शिखर सर करायला २२ जून पर्यंतचा अवधी (८५ व्यवहारांचे दिवस) घेतला. तेथून सेन्सेक्सने चार ऑगस्ट रोजी (३० सत्रांमध्ये) ५४ हजारांचा टप्पा गाठला.
विश्लेषकांच्या मते महागाई दरात आलेली घसरण आणि वाढत असलेले औद्योगिक उत्पादन यामुळे उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खरेदीची इच्छा असणाऱ्या गुंतवणुकदारांमुळे भारतीय निर्देशांक एक टक्क्यांहून जास्त वाढले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App