पाकिस्तान बॉर्डरपासून १० किलोमीटरवर पंतप्रधानांना सुरक्षेत त्रुटी, मुख्यमंत्र्यांनी खुर्ची सोङावी ; कॅप्टन अमरिंदर सिंग


वृत्तसंस्था

चंडीगड : पाकिस्तान बॉर्डर पासून केवळ 10 किलोमीटर असणाऱ्या हुसैनीवाला येथे पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहतात. पंजाब मधली कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे त्याचेच निदर्शक आहे. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब खुर्ची सोडावी, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केली आहे.Security flaw to PM at 10 km from Pakistan border, CM should hand over chair: Capt Amarinder Singh

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात मोदी सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळून आली. हुसैनीवालाच्या उड्डाणपुलावर पंतप्रधानांचा ताफा तब्बल 15 मिनिटे थांबवावा लागला होता. या वेळी पंतप्रधानांच्या प्रोटोकॉल नुसार पंजाब सरकारने सुरक्षा व्यवस्था केली नव्हती याचे गांभीर्य पंजाबच्या सरकारला नाही.



पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राच्या बॉर्डर पासून 10 किलोमीटर अंतरावर ही घटना घङणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. पंजाबच्या सरकारला आता सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. कारण राज्यातली कायदा सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली आहे. पोलिस यंत्रणेवर सरकारचे नियंत्रण उरलेले नाही, अशा शब्दात कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब सरकारचे वाभाडे काढले आहेत.

काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी पंतप्रधानांवर टीकेची झोड उठवली आहे. परंतु पंजाब प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख सुनील जाखड यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या सुरात सूर मिसळून पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असणे ही पंजाब सरकारची चूकच असल्याची टीका केली आहे.

Security flaw to PM at 10 km from Pakistan border, CM should hand over chair: Capt Amarinder Singh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात