मोदींचा काँग्रेसवरील हल्लाबोलचा दुसरा अंक राज्यसभेत; म्हणाले, काँग्रेस नसती तर…


प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस वरील हल्लाबोलचा दुसरा अंक आज राज्यसभेत सादर केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील चर्चेला पंतप्रधान मोदींनी आज उत्तर दिले. त्यावेळी केंद्र सरकारच्या कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला, पण काल लोकसभेत त्यांनी काँग्रेसवर प्रखर हल्ला चढवला होता त्याचाच दुसरा अंक आज राज्यसभेत सादर केला. काँग्रेस नसती तर दहशतवाद नसता. पंजाब मध्ये आणि दिल्लीच्या रस्त्यांवर शीख समुदायाची हत्याकांड झाले नसते. काँग्रेस नसती तर लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडून आलेली सरकारे बरखास्त झाली नसती, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी पंतप्रधान मोदी राज्यसभेत बोलले. Second issue of Modi’s attack on Congress in Rajya Sabha; Said, if there was no Congress …

मोदींचा काँग्रेसवर हल्ला प्रखर होत असताना काँग्रेसच्या सदस्यांनी सुरुवातीला राज्यसभेत घोषणाबाजी करून गदारोळ केला. पण मोदींचे भाषण थांबत नाही हे पाहून काँग्रेसच्या राज्यसभेतील या सर्व सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर पंतप्रधान मोदींचे भाषण शांततेत पार पडले.

भाषणाच्या उत्तरार्धात मोदींनी गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामाचा उल्लेख करत पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर हल्लाबोल केला. मोदी म्हणाले की, त्यावेळच्या काँग्रेस सरकार मुळे गोव्याला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही 15 वर्षे म्हणजे सन 1961 पर्यंत पारतंत्र्याच्या बेडीत जखडून राहावे लागले. कारण पंतप्रधान पंडित नेहरू यांना स्वतःच्या प्रतिमेची काळजी जास्त होती. देश हितापेक्षा ते स्वतःच्या प्रतिमेला जपत होते, असा आरोप त्यांनी केला. डॉ. राम मनोहर लोहिया, कर्नाटक केसरी जगन्नाथराव जोशी यांच्यासारख्या गोवा सत्याग्रहींना पंतप्रधान पंडित नेहरू यांनी असाह्य सोडून दिले. सत्याग्रहींच्या मदतीसाठी गोव्यात फौज पाठवली नाही. गोव्यातल्या स्वातंत्र्यसैनिकांना मदतही केली नाही इतकेच काय पण लाल किल्ल्यावरील भाषण आत गोव्यात फौज पाठवणार नाही अशी घोषणा देखील पंडित नेहरूंनी केली होती, याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधले.



अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोदी सरकारला सुनावणार्या काँग्रेसच्या नेत्यांना आणि त्यांच्या इकोसिस्टीमला देखील पंतप्रधान मोदींनी प्रतिटोला लगावला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काव्याला संगीत दिले या “गुन्ह्यासाठी” गोव्याचे सुपुत्र पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडिया रेडिओतील नोकरीवरून काढून टाकण्यात आले याची आठवण मोदींनी करून दिली. एवढेच नाही तर प्रसिद्ध गीतकार शाहीर मजरूह सुलतानपुरी, प्रख्यात गायक किशोर कुमार यांना काँग्रेसच्या सरकारांनी त्रास दिल्याच्या मुद्यांकडेही मोदींनी लक्ष वेधले.

आता काँग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींच्या राज्यसभेचे भाषणावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

  •  कोरोना आधीच्या स्थितीची तुलना करता लॉकडाऊन उठवल्यानंतर नोकरभरतीत दोन पट वाढ झाली आहे. नॅसकॉमच्या अहवालातही हाच कल दिसून आला आहे. अलिकडच्या वर्षांत IT क्षेत्रात 27 लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
  • महागाई रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. 2014 ते 2020 या दरम्यानच्या काळात महागाईचा दर 4 ते 5 टक्क्यांच्या दरम्यान होता. युपीएच्या काळाशी तुलना केली तर लक्षात येईल महागाई काय असते. आज देशाची अर्थव्यवस्था मोठी अर्थव्यवस्था होत असून विकासासोबत मध्यम महागाईचा सामना करत आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेचा वेग कमी झाला आहे अथवा महागाईचा उच्चांक गाठत आहे.
  • एमएसएमई आणि कृषी क्षेत्रात कोणताही अडथळा येणार नाही यासाठी सरकारने प्रयत्न केले. शेतकऱ्यांना अधिक एमएसपी मिळाला. पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाले.  संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या हातात पैसे होते. MSME सेक्टरच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला अधिक निधी मिळाला. भारत आता सर्वाधिक मोबाइल उत्पादन करणारा देश ठरला आहे. ऑटोमोबाइल आणि बॅटरी उत्पादन क्षेत्रात चांगले सकारात्मक वातावरण आहे.
  • कोरोना काळात गरिबांच्या सशक्तिकरणासाठी सरकारने प्रयत्न केले. 100 टक्के लसीकरणाच्या उद्दिष्टाकडे आपण वाटचाल करत आहोत. कोरोना काळात 80 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना मोफत रेशन देण्यात आले आहे.
  • अनेक अडथळे असूनही लाखो गरीब कुटुंबांना पक्की घरे देण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. घरं मिळाल्याने गरीब आता लखपती झाले आहेत.

Second issue of Modi’s attack on Congress in Rajya Sabha; Said, if there was no Congress …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात