सिएटल मध्ये जातिभेद विरोधी कायद्याला मंजुरी; अमेरिकेतले बनले पहिले शहर

वृत्तसंस्था

सिएटल : अमेरिकेतील सिएटल महापालिकेत जातिभेद विरोधी कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे. अशी मंजुरी देणारे ते अमेरिकेतले पहिले शहर बनले आहे. Seattle becomes first US city to outlaw caste discrimination;

अमेरिकेत भेदभाव विरोधी अनेक कायदे आहेत. यामध्ये वंश – लिंग भेदभाव विरहित समाजासाठी प्रोत्साहन देणारेही कायदे आहेत. पण जातिभेद विरोधी कायदा त्यात अस्तित्वात नव्हता. आता भेदभाव विरोधी कायद्यांमध्ये जातिभेद विरोधी कायद्याचाही समावेश करण्यात आला आहे.

अमेरिकेत भारतीयांना अनेक ठिकाणी वंशवाद, लिंगभेद यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर जातिभेदाचाही सामना करावा लागल्याची चिन्हे दिसली आहेत. नोकरी, व्यवसाय अशा अनेक ठिकाणी जातिभेदाची चिन्हे अजून कायम असल्याचे आढळले आहे. उच्चवर्णीयांना वरिष्ठ पदे आणि अधिक पगार, तर मागासवर्गीय यांना कनिष्ठ पदे आणि कमी पगार असा भेदभाव झाल्याचे आढळले आहे.

या पार्श्वभूमीवर सिएटल महापालिकेत जातिभेद विरोधी कायदा संमत करण्यात आला आहे, अशी माहिती सिएटल मधील नगरसेविका क्षमा सावंत यांनी दिली आहे.

भारतात कायद्याने अस्पृश्यता नष्ट केली आहे. जातिभेदालाही कायद्यात थारा नाही. तरीही सामाजिक पातळीवर जातिभेदाचे कंगोरे ठळक प्रमाणात दिसतात. यासाठी समाज सुधारण्याची पावले सरकारी आणि सामाजिक पातळीवर अनेकांनी उचलली आहेत. आता हेच लोण अमेरिकेत पोहोचून सिएटल सारख्या महत्त्वाच्या शहरात जातिभेद विरोधी कायदा अस्तित्वात आला आहे.

Seattle becomes first US city to outlaw caste discrimination;

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात