पंजाबमध्ये भाजप आणि संयुक्त अकाली दल यांच्याशी लवकरच जागावाटप समझोता – कॅप्टन अमरिंदरसिंग

वृत्तसंस्था

चंदिगड : पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी लवकरच भाजप आणि सुखदेव सिंह धिंडसा यांच्या संयुक्त शिरोमणी अकाली दलाशी जागावाटपाचा समझोता होईल, अशी माहिती पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी दिली आहे.Seat sharing with BJP and dindsa’s sanyukt akali dal will be announced soon, says Capitan Amarinder Singh


कॅप्टन अमरिंदरसिंग यांना महत्व न देण्याचे कॉंग्रेसचे धोरण


पंजाब लोक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णयाची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. भाजप आणि सुखदेव सिंह धिंडसा यांच्या संयुक्त शिरोमणी अकाली दलाशी जागावाटप समझोता करण्याचा निर्णय पंजाब लोक काँग्रेसने घेतला आहे. दोन्ही पक्षांची चर्चा करुन लवकरच जागावाटपाचा समझोता जाहीर करण्यात येईल, असे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी स्पष्ट केले आहे. विजयी होणाऱ्या उमेदवारांचीच निवड करणे हा प्रमुख निकष असेल. माझे दोन्ही पक्षांना हेच सांगणे आहे की त्यांनी देखील विजयी होणारे उमेदवार निवडावेत आणि त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पंजाब मध्ये काँग्रेस सरकार विरोधात मोठा असंतोष आहे. आम आदमी पार्टी कितीही जोर लावत असली तरी त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा पंजाबी जनतेला माहिती आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष मोठ्या प्रमाणावर पैसा ओतून प्रचार करत आहेत. पण त्यांना यश येणार नाही, असा दावा कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केला आहे.

Seat sharing with BJP and dindsa’s sanyukt akali dal will be announced soon, says Capitan Amarinder Singh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात