फटाक्यांवरील बंदीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने मांडली स्पष्ट मते


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – फटाक्यांवरील बंदीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने आपली मते स्पष्ट मांडली आहेत. केवळ काही लोकांच्या नोकऱ्यांचा विचार करून अन्य नागरिकांच्या जीवन जगण्याच्या अधिकारांचे उल्लंघन करता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.SC gave clear signal on crackers ban

आमच्या दृष्टीने रोजगार, बेरोजगारी आणि सामान्य नागरिकांच्या जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये समतोल राखणे गरजेचे आहे. केवळ काही लोकांच्या रोजगाराचा विचार करून आम्हाला इतरांच्या अधिकाराची पायमल्ली करता येणार नाही. सर्वसामान्य, निष्पाप लोकांच्या जीवन जगण्याचा अधिकार हा आमच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असून त्यावरच आमचे विशेष लक्ष आहे



हरित फटाक्यांना तज्ज्ञांच्या समितीने मान्यता दिली तर आम्ही त्या अनुषंगाने योग्य ते आदेश देऊ, असेही न्यायालयाने नमूद केले. आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठी अडचण ही अंमलबजावणी करण्यात असल्याची खंतही न्यायालयाने व्यक्त केली.

SC gave clear signal on crackers ban

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात