दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सावरकर सामील; माजी न्यायमूर्ती, सनदी – लष्करी अधिकारी यांच्याकडून स्वागत

प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठातील राज्यशास्त्र अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राजकीय विचार प्रणालीचा समावेश केल्यानंतर डाव्या, इस्लामी बुद्धिवंत, विचारवंतांनी वैचारिक आदळपट केली असली तरी देशातले माजी न्यायमूर्ती, माजी सनदी, लष्करी अधिकारी, माजी राजदूत, वेगवेगळे बुद्धिवंत आणि विचारवंत यांनी मात्र या घटनेचे स्वागत केले आहे.Savarkar joins Delhi University curriculum; Welcome by Ex-Judge, Chartered – Military Officer

त्याचबरोबर राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात सावरकरांचा समावेश करताना पाकिस्तानी विचार प्रवर्तक मोहम्मद इक्बाल यांना वगळून टाकल्याचेही अनेकांनी स्वागत केले आहे. देशाचा इतिहास आणि राज्यशास्त्र खऱ्या अर्थाने निःपक्षपाती पणाने शिकवण्यासाठी सावरकरांच्यासारख्या आधुनिक राष्ट्रीय विचारवंताच्या विचार प्रणालीचा समावेश अभ्यासक्रमात होणे गरजेचे होते. सावरकर दलित हक्कांचे समर्थक होते. त्याचबरोबर अखंड भारत हा त्यांच्या विचारप्रणालीचा केंद्रबिंदू होता. म्हणून त्यांच्या विचारांचा समावेश राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात करणे देशहिताचेच आहे. ते दिल्ली विद्यापीठाने साध्य केले आहे.



पण त्याचबरोबर डाव्या आणि इस्लामी विचारवंतांनी अभ्यासक्रमांमध्ये लादलेल्या मोहम्मद इक्बाल याच्या विचार प्रणालीचा प्रणालीला अभ्यासक्रमातून बाहेर काढणेही गरजेचे होते, तेही दिल्ली विद्यापीठाने केले आहे, असे या बुद्धिवंत, विचारवंत आणि अधिकारी यांनी काढलेल्या पत्रकार नमूद केले आहे.

मोहम्मद इक्बाल याने “सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा” हे गीत लिहिले तरी त्यापुढे जाऊन “चीन हमारा, अरब हमारा, मुस्लिम है हम सारा जहाँ हमारा”, असा बदल करून इस्लामी विचार प्रणाली संपूर्ण जगावर लादण्याचा विचार केला होता, हे मुद्दामून डावे आणि इस्लामी विचारवंत झाकून ठेवतात, याकडे संबंधित बुद्धिवंत, विचारवंत आणि सनदी अधिकाऱ्यांनी आवर्जून लक्ष वेधले आहे.

या अधिकारी, बुद्धिवंत आणि विचारवंतांमध्ये 123 जणांचा समावेश आहे. यामध्ये 12 माजी राजदूत, 64 माजी वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि 59 माजी सनदी अधिकारी आहेत, तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. धिंगरा, न्यायमूर्ती एस. एम. गर्ग आणि न्यायमूर्ती आर. एस. राठोड यांचाही समावेश आहे.

Savarkar joins Delhi University curriculum; Welcome by Ex-Judge, Chartered – Military Officer

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात