राहुलजींकडून सावरकरांचा अपमान; ठाकरेंनी कान टोचले, भाजप – शिवसेनेने सुनावले, तर भुजबळांनी पण डिवचले!!; ठाकरे – काँग्रेस काय करणार??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल गांधींनी केलेला अपमान हा विषयाचा महाराष्ट्रात खूप तापला आहे राहुलजींनी खासदारकी रद्द झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफी नाम्याचा अस्थानी मुद्दा उकरून काढला आणि त्यांना महाराष्ट्रातून प्रखर विरोधाला तोंड द्यावे लागले आहे. Savarkar insult issue; BJP Shivsena leaders targets Uddhav Thackeray, chagan Bhujbal targets rahul Gandhi

काल मालेगाव च्या सभेत उद्धव ठाकरेंनी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, अशा स्पष्ट शब्दात सुनावले. पण त्यावर भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी काँग्रेसची साथ सोडून दाखवावी. जर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्यांना खरा आदर सन्मान असेल तर कशासाठी सोनिया गांधींच्या शेजारी जाऊन बसायचे, शरद पवारांचा सल्ला घ्यायचा आणि राहुल गांधींचा हात धरायचा?, असा सवाल भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्याला बाळासाहेब ठाकरेंनी जोड्याने मारले, तसे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दिल्लीत जाऊन सावरकरांचा अपमान करणाऱ्याला जोड्याने मारणार आहेत का?, तसे उद्धव ठाकरेंनी केले तरच त्यांच्या मनात वीर सावरकरांविषयी आदर आहे आणि त्यांना आपल्या केलेल्या कृतीचा पश्चाताप झाला आहे सिद्ध होईल असा टोलाही अनिल बोंडे यांनी लगावला.



उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जिवंत केले. ते दोन्ही पक्ष महाराष्ट्रात मेले होते. सावरकरांविषयी त्यांना जर एवढे प्रेम असेल तर त्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसची साथ सोडून द्यावी, असे आव्हान शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दिले आहे, तर उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीची आता साथ सोडून द्यावी, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

भुजबळ यांनी पण सुनावले

सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून केवळ शिवसेना – भाजपनेच उद्धव ठाकरे यांना सुनावले असे नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि माजी शिवसैनिक छगन भुजबळ यांनी देखील राहुल गांधींना सुनावले आहे. नाशिक ही सावरकरांची जन्मभूमी आहे. सावरकरांविषयी महाराष्ट्रात सर्वत्र प्रेम आहेच. उद्धव ठाकरेंची भूमिका या संदर्भात योग्यच आहे. मोठ्या लढाईत छोट्या गोष्टींना महत्त्व द्यायचे नसते राहुल गांधींनी सावरकर या विषयावर बोलू नये ही अपेक्षा करणे चूक नाही, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस यांना डिवचले आहे.

तत्पूर्वी उद्धव ठाकरेंनी काल मालेगावच्या सभेत सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा राहुल गांधींना दिला. त्याचीच पुनरावृत्ती या सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली. सामनाच्या अग्रलेखातून सावरकरांच्या कार्याची महती गायली आहे. त्यांना नावे ठेवून आपल्याला यशस्वी लढा उभारता येणार नाही, असा इशारा सामनाच्या अग्रलेखातून राहुल गांधींना देण्यात आला आहे. पण हे नुसतेच तोंडी अथवा लेखी इशारे आहेत त्यामुळेच प्रत्यक्ष कृती करण्याचे आव्हान शिवसेना – भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहेत, तर छगन भुजबळ यांनी राहुल गांधीना सुनावले आहे. आता यावर उद्धव ठाकरे कोणती प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि राहुल गांधींची यावर प्रतिक्रिया काय देतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Savarkar insult issue; BJP Shivsena leaders targets Uddhav Thackeray, chagan Bhujbal targets rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात