विशेष प्रतिनिधी
मुंबई : नुकताच पनामा पेपर्स लीक या प्रकरणामध्ये बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला ईडीने चौकशी करण्यासाठी बोलावले होते. कसून तिची सहा तास चौकशी करण्यात आली होती. यानंतर मात्र जया बच्चन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत आपली नाराजगी व्यक्त केली होती.
Sanjay Raut gives support to Jaya Bachchan
त्या म्हणाल्या होत्या, सरकारच्या अशा वागणुकीवरून असे वाटतेय की, लवकरच त्यांचे वाईट दिवस सुरु होण्याची शक्यता आहे. आणि सरकारचा हा प्रयत्न अतिशय वाईट आहे. असे त्या म्हणाल्या होत्या.
Panama Papers : पनामा पेपर लीकप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला समन्स
यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना पाठिंबा देताना म्हटले आहे की, जया बच्चन यांच्याविरूद्ध सरकारची नाराजी आता सर्वांना कळाली आहे. जया बच्चन नेहमी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर निशाणा साधत असतात. त्याचाच परिणाम म्हणून त्याच्या परिवाराला त्रास दिला जात आहे. ऐश्वर्यानंतर आता जया बच्चन यांच्या बाकी परिवाराला देखील आता चौकशीसाठी बोलावले जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App