संघ आणि विश्व हिंदू परिषदेची दिल्लीतील कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची दिल्लीतील कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी एका व्यक्तीने विहिंप कार्यालयात घुसून ही धमकी दिल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर विहिंप कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला पकडून दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दिल्लीतील झंडेवाला येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात बुधवारी ही घटना घडली असून विहिंपनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. Sangh and Vishwa Hindu Parishad offices threatened to be bombedदिल्लीतील झंडेवाला येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात एका व्यक्तीने घुसून कार्यालय बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. ही बाब तत्काळ पोलिसांना कळवण्यात आली.

या व्यक्तीला कोठडीत ठेवण्यात आले. ते आल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात घुसून धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव राजकुमार पांडे आहे. तो मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. त्याची दिल्ली पोलीस चौकशी करत असून अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.

Sangh and Vishwa Hindu Parishad offices threatened to be bombed