सना रामचंद : पाकिस्तानमध्ये पहिली हिंदू महिला असिस्टंट कमिश्नर ; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव


  • सना रामचंदचे ट्वीट  ”वाहे गुरू जी का खालसा वाहे गुरू जी की फतेह.याचे संपूर्ण क्रेडिट माझ्या पालकांना जाते. ”

वृत्तसंस्था

लाहोर : पाकिस्तानमध्ये प्रथमच एक हिंदू महिला सहाय्यक आयुक्त बनली आहे. सना रामचंद असे तीचे नाव असून हे स्थान मिळविण्यासाठी तीने सेंट्रल सुपीरियर सर्व्हिस (सीएसएस) परिक्षा पास केली.यानंंतर तीची निवड पाकिस्तान प्रशासकीय सेवेत (पीएएस) झाली. ही पाकिस्तानमधील सर्वात मोठी प्रशासकीय परीक्षा आहे. सना  पेशाने एमबीबीएस डॉक्टर आहे.  Sana Ramchanda :  Hindu woman in Pakistan clears prestigious Central Superior Services examination

सना सिंध प्रांताच्या शिकारपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तीने सिंध प्रांताच्या चांदका मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले.

सीएसएस लेखी परीक्षेत 18,553 उमेदवार हजर होते. त्यापैकी 221 उत्तीर्ण झाले. सना स्थानिक माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, ‘मी खूप आनंदी आहे. मला लहानपणापासूनच यश आवडते आणि मला त्याची सवय झाली आहे. मी माझ्या शाळा, महाविद्यालय आणि एफसीपीएस परीक्षेतही अव्वल स्थान मिळवले आहे.’

सनाने कोणत्याही शिकवणी शिवाय हे यश मिळवलं आहे. ती कराची इथे वास्तव्यास आहे. तिने फक्त मुलाखतीसाठी शिकवणी लावली होती, असंदेखील तिने सांगितलं. तिला मिळालेल्या या यशामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे पाकिस्तानातील हिंदू समाजही तिचं कौतुक करत आहे. कारण पाकिस्तानात खूप कमी हिंदू महिलांना यश संपादित करण्यात यश आलेलं आहे. सनाचं सोशल मीडियावर देखील कौतुक केलं जात आहे.

Sana Ramchanda :  Hindu woman in Pakistan clears prestigious Central Superior Services examination

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!