समीर वानखेडे मुस्लिम नाहीत, जात पडताळणी समितीचा निर्वाळा; नवाब मलिक यांना झटका!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम नाहीत किंवा त्यांनी धर्मांतरही केलेले नाही, असा स्पष्ट निर्वाळा जात पडताळणी समितीने दिला आहे. समीर वानखेडे हे अनुसूचित जातीचे नसून ते मुस्लिम आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि सध्या तुरुंगात असलेले माजी मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. मात्र या आरोपात प्रथम असल्याचे जात पडताळणी समितीच्या निष्कर्षातून स्पष्ट झाले आहे.Sameer Wankhede is not a Muslim; Nirwala of Caste Verification Committee

शहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा ज्यावेळी ड्रग्स क्रुज प्रकरणात अडकला होता त्यावेळी समीर वानखेडे हेच त्या प्रकरणाचे तपास अधिकारी होते. त्यावेळी झालेल्या राजकीय घमासानात समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी विविध आरोप केले होते. त्यापैकी एक आरोप ते मुस्लिम असल्याचा होता. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुस्लिम महिलेशी लग्न केले. त्यांनी देखील इस्लाम स्वीकारला होता.



त्यामुळेच समीर वानखेडे हे देखील मुस्लिम आहेत, असा तो आरोप होता. या आरोपाबरोबरच नवाब मलिकांनी आपल्या ट्विटर हँडल वरून समीर वानखेडे यांचे मुस्लिम टोपी घातलेले फोटो देखील शेअर करून त्यांच्याबरोबर अनेक वेळा नमाज पठण केल्याचा उल्लेख केला होता. परंतु अलिकडे ते सामुदायिक नमाज पठणात दिसत नाहीत, असा टोमणा लगावला होता.

त्या पलिकडे जाऊन समीर वानखेडे यांनी खोटी जात लावून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये नोकरी मिळवून बढती पण मिळवली आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी जात पडताळणी समितीकडे धाव घेऊन आपली बाजू मांडली. जात पडताळणी समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम नसल्याचा तसेच त्यांच्या वडिलांनी आणि त्यांनी इस्लाम मध्ये धर्मांतर केले नसल्याचा कोणताही पुरावा नाही. ते महार 37 – शेड्युल कास्टचे असल्याचे सिद्ध झाले आहे, असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे.

Sameer Wankhede is not a Muslim; Nirwala of Caste Verification Committee

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!