विशेष प्रतिनिधी
मुबंई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी लाचखोरीच्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे. या आरोपाच्या अंतर्गत तपासासाठी एनसीबीच्या दक्षता शाखेचे पाच सदस्यीय पथक बुधवारी सकाळी मुंबईत पोहोचले आणि थेट एजन्सीच्या झोन कार्यालयात गेले आणि सुमारे चार तास वानखेडे यांची चौकशी केली. सोबतच या प्रकरणाशी संबंधित फाईल्सही ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
Sameer Wankhede is being questioned by the NCB’s vigilance branch after allegations of bribery
ही विशेष चौकशी असल्याचे सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. के.पी.गोसावी यांचे अंगरक्षक प्रभाकर सेलने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केलेल्या लाचखोरीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी हे पथक तयार करण्यात आले आहे.
Sameer Wankhede : समीर वानखेडेंचा निकाह लावणाऱ्या काझींचा खुलासा, म्हणाले- ‘लग्नाच्या वेळी मुसलमान होते संपूर्ण कुटुंब’
या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे तपास पथकाकडे सुपूर्द केली आहेत. गरज पडल्यास त्यांची पुन्हा चौकशी केली जाईल. जोपर्यंत त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत ते क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून काम पाहतील. असे सिंग यांनी यावेळी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App