विशेष प्रतिनिधी
बेळगाव : कर्नाटकातील धारवाड शहरात रशियाच्या स्पुटनिक – 5 या लशीची निर्मिती होणार आहे. त्यासाठी शिल्पा बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेडने हैद्राबाद येथील डॉ. रेड्डी लॅबशी याबाबतचा करार केला आहे. Russia’s Sputnik vaccine will be manufactured in Dharwad, Karnataka; The target is five crore doses a year
शिल्पा मेडिकेअरची उपकंपनी असलेल्या शिल्पा बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेडने लसनिर्मितीसाठी 3 वर्षांचा करार डॉ. रेड्डी लॅबबरोबर केला आहे.ही कंपनी स्पुटनिक लशीचे 5 कोटी डोस पहिल्या 12 महिन्यात तयार करणार आहे. त्यामध्ये लसीच्या दोन्ही डोसचा समावेश आहे.
झालेल्या करारानुसार शिल्पा बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड लशीची निर्मिती करणार असून डॉ. रेड्डी कंपनी वितरण आणि मार्केटिंग करणार आहे.
भविष्यात स्पुटनिक लशीच्या सिंगल डोसची निर्मिती करण्याचा मानस कंपनीचा आहे. कंपनीने असेही सांगितले की, धारवाड येथे अत्याधुनिक जैविक तंत्रज्ञानाने युक्त सुविधा आहेत. त्या लस निर्मितीसाठी उपयुक्त आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App