वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा भारतावर रशियाकडून आयात थांबविण्यासाठी दबाव आहे. भारताने रशिया कडून तेल किंवा अन्य माल खरेदी करू नये यासाठी दबाव वाढवला जात आहे. पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी थेट अमेरिकेत जाऊनच अमेरिका आणि युरोपची पोलखोल केली आहे. भारत संपूर्ण महिनाभरात रशियाकडून जेवढे तेल खरेदी करत नाही, तेवढे तेल संपूर्ण युरोप रशियाकडून एका दुपारपर्यंत खरेदी करतो, अशा शब्दांत जयशंकर यांनी अमेरिकन पत्रकारांसमोर युरोप आणि अमेरिकेची पोलखोल केली आहे. Russia – US Europe: Europe buys as much oil as it does from Russia in a month, by noon; Jaishankar did “Polkhol” !!
भारताला रशियाकडून तेल खरेदी संदर्भात प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही युरोप काय करतो यावर लक्ष केंद्रित करा, असा टोला जयशंकर यांनी अमेरिकेत बायडेन प्रशासनाला आणि अमेरिकन मीडियाला हाणला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे दोघेही वरिष्ठ मंत्री भारत अमेरिका द्विमंत्री चर्चेसाठी सध्या अमेरिकेत आहेत. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना जयशंकर यांनी अमेरिकेची पुरती पोलखोल केली.
Concluded a productive and substantive 2+2 Ministerial Meeting. Discussed contemporary challenges and issues in an open and constructive manner. Resolved that our strategic partnership would continue to grow and play a greater role in shaping the direction of world affairs. pic.twitter.com/dO9GwvzAI6 — Dr. S. Jaishankar (Modi Ka Parivar) (@DrSJaishankar) April 12, 2022
Concluded a productive and substantive 2+2 Ministerial Meeting.
Discussed contemporary challenges and issues in an open and constructive manner. Resolved that our strategic partnership would continue to grow and play a greater role in shaping the direction of world affairs. pic.twitter.com/dO9GwvzAI6
— Dr. S. Jaishankar (Modi Ka Parivar) (@DrSJaishankar) April 12, 2022
रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि युरोपीय देशांनी जरी रशियावर निर्बंध घातले असले तरी प्रत्यक्षात रशियाकडून तेल खरेदी करण्याची युरोप मागे नाही. रशियाकडून तेल खरेदी करणे युरोपने थांबवलेले नाही, हा मुद्दा जयशंकर यांनी प्रकर्षाने अमेरिकन मीडियाच्या लक्षात आणून दिला. याबाबतच बोलताना त्यांनी भारत रशियाकडून महिनाभरात जेवढे तेल खरेदी करत नाही तेवढे तेल संपूर्ण युरोप एका दुपारपर्यंत रशियाकडून खरेदी करतो, अशा शब्दांत त्यांनी अमेरिका आणि युरोपीय धोरणाचे वाभाडे काढले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App