रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र (UN) सातत्याने शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. यासंदर्भात आज पुन्हा एकदा सुरक्षा परिषदेची (UNSC) बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत संयुक्त राष्ट्र महासभेची तातडीची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावावर मतदान होणार आहे. हा ठराव मंजूर झाल्यास सोमवारी १९३ सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्र महासभेची बैठक होणार आहे. Russia-Ukraine war Attempts to re-engage internationally against Russia, re-vote in UNSC today
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र (UN) सातत्याने शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. यासंदर्भात आज पुन्हा एकदा सुरक्षा परिषदेची (UNSC) बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत संयुक्त राष्ट्र महासभेची तातडीची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावावर मतदान होणार आहे. हा ठराव मंजूर झाल्यास सोमवारी १९३ सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्र महासभेची बैठक होणार आहे.
विशेष बाब म्हणजे या मतदानात सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका यापैकी कोणालाही व्हेटो वापरता येणार नाही. मुत्सद्दींनी सांगितले की, या निर्णयाच्या बाजूने नऊ मतांची आवश्यकता आहे आणि ती पास होण्याची शक्यता आहे.
1950 पासून महासभेची अशी केवळ 10 आपत्कालीन विशेष सत्रे बोलावण्यात आली आहेत. या बैठकीत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्याचा प्रस्ताव UNSC मध्ये ठेवला जाईल. दरम्यान, नुकतीच UNSC ने एक बैठक बोलावली, ज्यामध्ये चीन, भारत आणि UAE सहभागी झाले नाहीत, तर 11 सदस्यांनी UNSC ठरावाच्या बाजूने मतदान केले.
सदस्य देशांकडून रशियाविरोधात सातत्याने वक्तव्ये केली जात आहेत, असे UNSCच्या वतीने सांगण्यात आले. अशा स्थितीत महासभेत अशाच प्रस्तावाच्या बाजूने मतदान होणे अपेक्षित आहे. रशियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्यासाठी अमेरिका आणि मित्रराष्ट्रे सतत पाठिंबा शोधत आहेत.
यूएनच्या प्रवक्त्याने सांगितले की, यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी शनिवारी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. युक्रेनच्या लोकांना जागतिक स्तरावर मदत करण्यासाठी योजना आखल्या जात असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
UN मदत प्रमुख मार्टिन ग्रिफिथ्स यांनी शुक्रवारी सांगितले की पुढील तीन महिन्यांत युक्रेनला $1 अब्ज पेक्षा जास्त मदतीची आवश्यकता असेल. कारण रशियाच्या हल्ल्यानंतर हजारो लोक बेघर होत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App