प्रतिनिधी
नवी दिल्ली : जगभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना भारतासह अनेक देशांनी सावध भूमिका घेतली आहे. चीनमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर झाल्यामुळे सर्व देशांमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. भारतात अजूनही कोरोनाची चौथी लाट आलेली नाही. परंतु, कोरोना महामारीचे गांभीर्य पाहून भारतीय आरोग्य मंत्रालयाने काही महत्त्वाचे निर्णय घेत आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. RT-PCR test 72 hours before international flight is mandatory
प्रवाशांसाठी RTPCR चाचणी अनिवार्य
या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार चीन, सिंगापूर, हॉंगकॉंग, दक्षिण कोरिया, थायलंड आणि जपान येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बोर्डिंगच्या ७२ तास आधी RTPCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.
चीन, हॉंगकॉंग, दक्षिण कोरिया, सिंगापूर, थायलंड आणि जपान या ६ देशांमधून येणाऱ्या नागरिकांनी आपली RT-PCR चाचणी करून त्याचा निगेटिव्ह अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करायचा आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App